Prime Minister Modi Appeal to enthusiastically participate in Amrit Mahotsav in Mann Ki Baat esakal
देश

पुढील २५ वर्षे हा कर्तव्यकाळ

पंतप्रधान मोदी : अमृत महोत्सवात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - ‘भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लवकरच साजरा होत असून हा एक ऐतिहासिक क्षण असेल. सर्व भारतीयांनी त्यामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना केले. ‘मन की बात’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत त्यांनी पुढील २५ वर्षे हा सर्वांसाठी ‘कर्तव्यकाळ’ असल्याचीही जाणीव करून दिली.

‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा ९१ वा भाग होता. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने हा भाग विशेष असल्याचे मोदी यांनी सुरुवातीला सांगितले. मोदी म्हणाले,‘‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने आता एका लोकचळवळीचे रूप घेतले आहे. सर्व क्षेत्रे आणि समजाच्या प्रत्येक वर्गातील लोक, त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेत आहेत. देशातल्या ७५ रेल्वे स्थानकांची अतिशय सुरेख सजावट करण्यात आली आहे. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना ही स्थानके दाखवावीत, असा मी आग्रह करेन.’’

आपण पुढील वेळू भेटू तेव्हा आपला आगामी २५ वर्षांचा प्रवास सुरु झालेला असेल. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन तुम्ही कसा साजरा केलात, कोणत्या विशेष गोष्टी केल्या या सर्वांची माहिती मला जरूर कळवा, असे आवाहन मोदींनी केले. आपल्या गावांमध्ये भरणाऱ्या जत्रांमध्ये सहभाग घेऊन त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करावीत, लवकरच सरकारतर्फे एक स्पर्धा जाहीर होऊन, चांगल्या छायाचित्राला बक्षीसही दिले जाणार आहे, असेही मोदींनी सांगितले.

प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवा तिरंगा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा, हर घर तिरंगा’ हे विशेष अभियान राबविले जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन आपण सर्वांनी या काळात आपल्या घरावर तिरंगा ध्वज जरूर फडकवावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. तसेच, दोन ऑगस्टपासून ते १५ ऑगस्टपर्यंत आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल पिक्चरमध्येही तिरंगा लावू शकतो, असेही मोदींनी सुचविले.

खेळण्यांचे पॉवर हाऊस

भारतात खेळण्यांच्या निर्यातीचे पॉवर हाऊस होण्याची क्षमता आहे, असे पूर्वी मी सांगितले होते, याची आठवण मोदींनी यावेळी करून दिली. ‘आता परदेशातून भारतात येणाऱ्या खेळण्यांची संख्या सतत कमी होत आहे. पूर्वी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याची खेळणी परदेशातून आयात होत असत. आता ही आयात ७० टक्क्यांनी कमी झाली आहे. या काळात भारताने दोन हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या खेळण्यांची निर्यात केली आहे,’ असे मोदींनी सांगितले. यावेळी त्यांनी पुण्यातील फनव्हेंशन लर्निंग या कंपनीसह देशातील विविध कंपन्यांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांचा कौतुकाने उल्लेख केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT