PM Modi Rajya Sabha Speech Esakal
देश

PM Modi Speech: 'प्रपोगंडा ते संविधान...' पंतप्रधानांच्या राज्यसभेतील भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे

PM Modi Speech In Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मंगळावारी लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले होते.

आशुतोष मसगौंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मंगळावारी लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले होते.

काँग्रेसला परजीवी म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधी सदस्य वेलमध्ये उतरत घोषणाबाजी करत राहिले. विरोधकांच्या गदारोळात आणि घोषणाबाजीत पंतप्रधानांनी आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले.

यावेळी पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यातील 10 महत्त्वाच्या मुद्यांचा आढावा घेणार आहोत.

"काही लोकांना जनादेश समजला नाही"

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले की, अनेक दशकांनंतर एखाद्या सरकारला सलग तिसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, अजूनही काही लोकांना जनादेश समजला नाही.

"आमची आणखी 20 वर्षे बाकी आहेत"

निकाल आल्यापासून आमचे एक सहकारी वारंवार ढोल बडवत होते की, आमचे सरकार एकतृतीयांश पक्षांचे आहे. आमची सत्ता येऊन 10 वर्षे उलटली असून आणखी 20 वर्षे बाकी आहेत.

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

संविधानाबाबत ओरड करणाऱ्यांना संविधानाचा आत्मा कळाला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सांगितले. काँग्रेसने संविधान दिनालाही विरोध केल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, 'माझ्यासारखे अनेक जण आहेत, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे येथे येण्याची संधी मिळाली आहे.

संविधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'जेव्हा आमच्या सरकारने लोकसभेत 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, जे लोक संविधानाची प्रत घेऊन फिरत आहेत त्यांनी प्रजासत्ताक दिन असताना, संविधान दिनाची काय गरज? असा प्रश्न केला होता.

आज संविधान दिनाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेचा आत्मा, राज्यघटनेच्या निर्मितीमागील भूमिका काय होती, कोणत्या कारणांसाठी देशाच्या मान्यवरांनी संविधान बनवताना काही गोष्टी वगळण्याचा आणि काही गोष्टी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, याविषयी शिकवले जाते.

संविधानावरील विश्वासाची व्यापक भावना जागृत केली पाहिजे आणि संविधानाची समज विकसित झाली पाहिजे. संविधान हीच आपली प्रेरणा राहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

"जनतेने प्रपोगंडाचा पराभव केला"

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'या निवडणुकांमध्ये देशातील जनतेच्या बुद्धिमत्तेचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी प्रपोगंडाचा पराभव केला. जनतेने सत्य परिस्थितीला प्राधान्य दिले. फसवणुकीचे राजकारण त्यांनी नाकारले आणि विश्वासाच्या राजकारणावर विजयाचा शिक्का मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT