Prime Minister Narendra Modi over E-waste recycling benefits at Mann Ki Baat esakal
देश

PM Narendra Modi : ई कचऱ्याचा पुनर्वापर हिताचा; पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ई कचऱ्याच्या गंभीर समस्येकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमामध्ये आज लक्ष वेधले. ई कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर, यामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते. हा ई कचरा काळजीपूर्वक निकाली काढला तर पुनर्वापर प्रक्रियेतून अर्थव्यवस्थेला लाभ होऊ शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी आज केले.

‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या नव्या वर्षातील पहिल्या भागात पंतप्रधान मोदींनी श्रोत्यांशी संवाद साधला. प्रजासत्ताक दिनाचे देखणे संचलन, दुर्लक्षित राहून समाजसेवा करणाऱ्या पद्मपुरस्कार विजेत्यांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी जनतेला पद्मपुरस्कार विजेत्यांबद्दल जाणून घ्यावे असे आवाहन केले.

ई-कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधताना मोदी म्हणाले की इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापरातून तयार होणाऱ्या ई कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही तर पर्यावरणाची हानी होऊ शकते. काळजीपूर्वक हा कचरा हाताळल्यास त्याचा पुनर्वापर होऊ शकतो आणि त्यातून अर्थव्यवस्थेला ताकद मिळू शकते, असेही मोदी म्हणाले.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या पैलूंची प्रशंसा होते असे सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की या संचलनात कर्तव्य पथाचे निर्माण करणाऱ्या कष्टकऱ्यांना पाहून आनंद वाटला. संचलनामध्ये पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या महिला सांडणीस्वार आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या महिला तुकडीचेही कौतुक होत आहे.

पद्म पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांबद्दल जाणून घेण्याचे श्रोत्यांना आवाहन करताना मोदी म्हणाले, की आदिवासी समुदायांशी संबंधित गोष्टींचे संरक्षण आणि त्यावर संशोधनाचे प्रयत्न होत आले आहेत. त्यापार्श्वभूमीवर टोटो, हो, कुई, कुवी आणि मांडा यासारख्या भाषांवर काम करणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले. ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध भिख्खू संघाची तुलना भारतीय संसदेशी केली होती, असा उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी सांगितले, की भिख्खू संघ अशी संस्था होती ज्यात प्रस्ताव, संकल्प, गणसंख्या, मतगणना यासाठी वेगवेगळे नियम होते. बाबासाहेबांचे मानणे होते की भगवान बुद्धांना याची प्रेरणा तत्कालीन राजकीय व्यवस्थेतून मिळाली असावी, असेही मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्रांनी ‘योग दिवस’ आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष जाहीर केले. हा निर्णय भारताच्या प्रस्तावानंतर घेण्यात आला. दोन्ही भूमिकांमध्ये जनतेची भागीदारी होती.

‘पर्पल फेस्ट’चे कौतुक

दिव्यांगजनांसाठी गोव्यामध्ये झालेल्या पर्पल फेस्ट इव्हेंटचाही पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला. दिव्यांगांच्या कल्याणासाठी हा आगळावेगळा प्रयत्न होता. यामध्ये ५० हजाराहून अधिक दिव्यांग सहभागी झाले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT