नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात ओळखले जाऊ लागलेले नेते ठरत आहे. ते जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत. शिवाय, त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अप्रूवल रेटिंग सर्वे करणाऱ्या इप्सोस इंडियाबस या संस्थेने यावर शिक्कोमोर्तबतच केले आहे. (prime minister narendra modi popularity approval rating-increased to 75 percent)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अप्रूवल रेटिंमध्ये (मान्यता प्राप्त नेता ) वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये ७५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळवली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०२३ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती. त्यात आता १० टक्क्यांची वाढ झाली आहे. याचाच अर्थ निवडणुका जवळ आल्या असताना लोकांचा कल मोदींच्याच बाजूने असल्याचं चित्र आहे.
२०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांना ६० टक्के अप्रूवल रेटिंग होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांना ६७ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती. म्हणजेच पंतप्रधान मोदी यांना दिवसेंदिवस मान्यता वाढत असल्याचं दिसत आहे. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये त्यांच्या अप्रूवल रेटिंगमध्ये २ टक्क्यांनी घट झाली होती. पण, त्यांनी पुन्हा एकदा मोठी मजल मारली आहे. २०२४ मध्ये त्यांनी अप्रूवल रेटिंग वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात अनेक महत्त्वाच्या घटना देशात घडल्या आहेत. भारतात जी-२० परिषद आयोजित करण्यात आली होती. देश अंतराळ क्षेत्रात मोठी मजल मारत आहे. जगातील प्रमुख देशांसोबत भारताने महत्त्वाचे करार केले आहेत. शिवाय, अनेक देशांसोबत भारताचे संबंध सुधारले आहेत.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये हिंदू मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. मेक इन इंडियाला चालना मिळत आहे अशा काही गोष्टी मोदींच्या पथ्यावर पडल्या आहेत. त्यामुळे त्यांची अप्रूवल रेटिंग वाढली आहे. राम मंदिराच्या निर्माणामुळे प्रामुख्याने उत्तर भारतात मोदींची लोकप्रियता वाढली आहे.
४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे व्यक्ती- ७९ टक्के
१८ ते ३० वयोगटातील व्यक्ती -७५ टक्के
३१ ते ४५ वयोगटातील व्यक्ती -७१ टक्के
महिला- ७५ टक्के
पुरुष- ७४ टक्के
(Modi's popularity increased again! Approval rating increased by 10 percent compared to 2023)
प्रदूषण आणि पर्यावरण - ५६ टक्के
गरीबी निर्मूलन- ४५ टक्के
चलनवाढ रोखणे- ४४ टक्के
बेरोजदारी दूर करणे- ४३ टक्के
भ्रष्टाचार संपवणे- ४२ टक्के
उत्तर भारत- ९२ टक्के
पूर्व भारत- ८४ टक्के
पश्चिमी भारत-८० टक्के
दक्षिण भारत -३५ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.