देश

PM Narendra Modi:'प्रत्येकवर्षी माझी दिवाळी सीमेवरच', पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

सकाळ डिजिटल टीम

PM Modi Meets Soldier on Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीय सैन्यदलाच्या जवानांबरोबर हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे दिवाळी साजरी केली. या वेळी त्यांनी देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

सीमेवर असणाऱ्या जवानांना शुभेच्छा देताना ते म्हणाले, ‘‘मागील ३० ते ३५ वर्षांतील एकही दिवाळी अशी नाही की जी मी जवानांबरोबर साजरी केली नाही.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘जिथे राम असेल तिथे अयोध्या असते, असे म्हटले जाते. माझ्यासाठी जिथे सैन्यदलांतील जवान तिथे अयोध्या आहे. जिथे जवान असतात, तिथेच माझे सण-उत्सव असतात. ज्यावेळी मी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री कोणीच नव्हतो. त्यावेळीदेखील मी सीमेवरच दिवाळी साजरी करत असे,’’

देशातील प्रत्येक घरात सीमेवरील जवानांसाठी प्रार्थना म्हटली जात असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले. ज्या ठिकाणी जवान सुरक्षेकरिता तैनात असतात. ती जागा माझ्यासाठी एखाद्या मंदिरापेक्षाही कमी नसते, असे गौरवोद्गार त्यांनी जवानांविषयी काढले. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांमध्ये ५०० महिलांची सैन्यदलात कायमस्वरूपी भरती करण्यात आले आहे. याबाबत बोलताना पंतप्रधानांनी महिलांच्या योगदानाचेही कौतुक केले. तसेच, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सैन्यदलातील जवानांनी अनेक युद्धांबरोबरच देशवासीयांची मनेही जिंकल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की," जेथे आपले कुटुंब असते, त्या ठिकाणी सण-उत्सव साजरे केले जातात. मात्र, जवान हे आपले कर्तव्य बजावण्याकरिता सीमेवर आपल्या कुटुंबापासून लांब असतात. ही गोष्ट जवानांमधील समर्पण आणि कर्तव्य भावनेचे तत्त्व दर्शविते."(Latest Marathi News)

मोदींचे गौरवोद्‍गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी सैन्यदलातील जवानांच्या राष्ट्रनिर्माण कार्यातील योगदानाबद्दल गौरवोद्‍गार काढले. ‘‘जागतिक पातळीवरील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, भारताकडून जगाच्या असणाऱ्या अपेक्षांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. अशा परिस्थितीत देशाच्या सीमा सुरक्षित असणे अत्यावश्यक आहे.

सीमांवर जवान तैनात असल्यामुळे देश सुरक्षित आहे. सैन्यदलाने आणि लष्करानेही राष्ट्रनिर्माण कार्यात सातत्याने योगदान दिले आहे,’’ असे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हृदयद्रावक ! पिकनिकला निघालेल्या शाळेच्या बसने अचानक घेतला पेट, २५ मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती

iPhone मागवला, पैसे देण्याऐवजी डिलिव्हरी बॉयचा केला खून; मृतदेहाची 'अशी' लावली विल्हेवाट

WTC 2023-25 Points Table: टीम इंडियाने सिंहासन केलं भक्कम, पण आता आव्हान न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचे

Suyash Tilak: "पैसे न देणाऱ्यांचं..." मराठी अभिनेत्याला मिळाले नाहीत कामाचे पैसे; पोस्ट करत व्यक्त केला संताप

Latest Maharashtra News Updates : यशवंत सहकारी साखर कारखान्याची ११७ एकर जमीन विक्रीला

SCROLL FOR NEXT