Surat Diamond Bourse  esakal
देश

Surat Diamond Bourse : PM मोदींच्या हस्ते आज सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवारी) सुरत आणि वाराणसी येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते १७ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन करतील.

संतोष कानडे

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवारी) सुरत आणि वाराणसी येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते १७ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन करतील. तसेच सुरत इंटरनॅशनल एअरपोर्टवरील नव्याने बांधण्यात आलेल्या इंटिग्रेटेड टर्मिनलचं उद्घाटन करतील.

इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगला सुरतची स्थानिक संस्कृती आणि परंपरेसोबत जोडण्यात आलेलं आहे. या टर्मिनलच्या माध्यमातून १२०० डोमेस्टिक आणि ६०० इंटरनॅशनल पॅसेंजर्सना हाताळण्याची क्षमता असणार आहे. तसेच या टर्मिनलची वार्षिक प्रवाशी क्षमता ५५ लाखांपर्यंत वाढण्यात आलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन करणार आहेत.जगातील हिऱ्यांच्या दागिन्यांचं हे सर्वात मोठं केंद्र ठरणार आहे. कच्चे आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांसोबतच दागिन्यांच्या बाजाराचं सुरत जागतिक केंद्र होत आहे. डायमंड बोर्समध्ये आयात-निर्यातीसाठी स्टेट ऑफ द कस्टम क्लिअरेन्स हाऊस, रिटेल ज्वेलरी बिझनेससाठी ज्वेलरी मॉल, जागतिक बँकिंग आणि सिक्योर वॉल्टची सुविधा देण्यात आलली आहे.

त्यानंतर पंतप्रधान वाराणसीला पोहोचतील. तिथे साधारण साडेतीन वाजता विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. सायंकाळी ५.१५ वाजता ते नमो घाटावर काशी तमिल संगमम २०२३चं उद्घाटन करतील. त्यानंतर १८ तारखेला सकाळी १०.४५ वाजता मोदी स्वर्वेद महामंदिरात जातील. पुढे साडेअकरा वाजता एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मोदींचा सहभाग असेल.

दरम्यान, सुरतच्या डायमंड बोर्समुळे मुंबईतील रोजगारावर परिणाम होणार आहे, अशी भीती शरद पवारांनी व्यक्त केलीय. सातत्याने उद्योग गुजरातल्या नेण्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपवर टीकास्र सोडलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi यांची १४ नोव्हेंबरला नवी मुंबईत सभा, वाहतुकीत मोठा बदल, महत्त्वाचे मार्ग बंद ठेवणार

IPL 2025: दिल्ली संघात २०११ वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची एन्ट्री! १८ व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

Sharad Pawar : चुकीची कामे किती करावी, फसवेगिरी किती करावी; फसवेगिरी करणाऱ्यांना धडा शिकवा

Women’s Asian Champions Trophy: दीपिकाच्या गोलमुळे भारताचा विजय; दक्षिण कोरियावर ३-२ने मात

Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी पुण्यात केले छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना नमन; म्हणाले- छत्रपतींच्या पुण्यभूमीमध्ये औरंगजेबाचे.....

SCROLL FOR NEXT