Narendra Modi sakal
देश

Narendra Modi : विकासाच्या अजेंड्यावर भर द्या;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

लोकांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थींची संख्या जास्तीत जास्त करावी व राज्यातील नेत्यांनी गटबाजीमध्ये अडकून न राहता जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सल्ला दिला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थींची संख्या जास्तीत जास्त करावी व राज्यातील नेत्यांनी गटबाजीमध्ये अडकून न राहता जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सल्ला दिला.

भाजपशासित सर्व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक आज भाजपच्या मुख्यालयात पार पडली. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांची दिल्लीतील ही पहिलीच बैठक आहे. ही बैठक उद्याही होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांनी विकासाचा अजेंडा राबविण्याचा कानमंत्र दिला. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्राचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीमध्ये काही राज्यांमध्ये भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागले. उत्तरप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही महिन्यात महाराष्ट्रासह हरियाना, झारखंड व जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्यांचे प्रश्न व प्रचाराचे मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

कामाचा आढावा

सर्व मुख्यमंत्र्यांना विकास कामे कोणती केली, याचा आढावा या बैठकीत सादर करावयाचा आहे. यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांना एक प्रश्नावली दिली आहे. यात विकास कामांची किती टक्के अंमलबजावणी झाली व कोणत्या योजनांची अंमलबजावणी झाली नाही, त्याची कारणे काय आहेत, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे.

गटबाजीपासून दूर रहा

या बैठकीत गटबाजीपासून सर्व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दूर राहावे, असा कडक इशारा दिल्याचे समजते. उत्तर प्रदेशमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यामध्ये असलेल्या मतभेद उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे, अशी पंतप्रधानांनी सुचविल्याचे समजते.

अर्थसंकल्पावर भर

केंद्रीय अर्थसंकल्पात बिहार व आंध्रप्रदेश वगळता इतर राज्यावर अन्याय झाल्याच्या विरोधकांच्या आरोपांना समर्थ उत्तर द्या, असेही निर्देश पंतप्रधानांनी दिले.

शहांसोबत फडणवीस-अजित पवारांची बैठक

महाराष्ट्राच्या निवडणुकीच्यासंदर्भात राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याच्या संदर्भात ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला कमी यश मिळाल्याने महायुतीच्या चिंता वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यावर चर्चा झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र उपस्थित नव्हते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT