Supreme Court esakal
देश

Supreme Court: खासगी रुग्णालये अनुदानावर जमिनी घेतात, पण गरिबांसाठी बेड ठेवत नाहीत; सुप्रीम कोर्टाने फटकारले

Supreme Court: सरकारने नेत्र उपचारांसाठी देशभरात एकसमान दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑल इंडिया ऑप्थाल्मोलॉजिकल सोसायटीने याला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Sandip Kapde

Supreme Court: सरकारकडून अनुदानावर जमीन संपादित करून उभारल्या जाणाऱ्या खासगी रुग्णालयांवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरकारकडून जमीनी घ्यायच्या रुग्णालये बांधायचे आणि गरिबांना खाटा राखून ठेवण्याचे आश्वासन पूर्ण करायची नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांनी नेत्र उपचारांसाठी देशभरात एकसमान दर निश्चित करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली. अनुदानावर जमीन घेताना रुग्णालये सांगतात की 25 टक्के खाटा गरिबांसाठी राखीव ठेवतील परंतु असे कधीच होत नाही. हे आपण अनेकदा पाहिले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सरकारने नेत्र उपचारांसाठी देशभरात एकसमान दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑल इंडिया ऑप्थाल्मोलॉजिकल सोसायटीने याला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तज्ञांचे दर समान असू शकत नाहीत, असे याचिकेत म्हटले आहे.

वकिल मुकुल रोहतगी आणि बी विजयालक्ष्मी यांनी सरकारचा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान न्यायालयाने याप्रकरणी केंद्र सरकारने म्हणणे जाणून घेण्यासाठी नोटीस पाठवली आहे. पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे.

न्यायमूर्ती धुलिया म्हणाले, "अखेर तुम्ही या धोरणाला आव्हान कसे देऊ शकता? उदाहरणार्थ, ईशान्येकडील आरोग्य सेवांचे दर कमी आहेत आणि हा नियम रद्द केल्यास त्याचा परिणाम होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधीही लोक देशातील खाजगी रुग्णालयांच्या महागड्या फी आणि सेवांबद्दल चिंता व्यक्त करत आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

SCROLL FOR NEXT