नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवर केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी रविवारी (ता.१९) म्हणाल्या, की ही योजना देशाच्या तरुणांसाठी नाही. उलट ती मोठ्या उद्योगपतींसाठी आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी जंतर-मंतरवर काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) वतीने आयोजित 'सत्याग्रहा' त त्या सहभागी झाल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी तरुणांना अग्निपथ योजनेविरोधात शांततेने निदर्शने करण्याचे आवाहन केले. (Priyanka Gandhi Criticize Modi Government And Says Agnipath Scheme Will Kill Youth Of The Country)
त्याच बरोबर त्यांनी काँग्रेस पक्षाकडून पूर्ण समर्थन असेल असे आश्वासन दिले. सर्व खासदारांसह पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांना म्हणाल्या, तुमच्यापेक्षा मोठा देशभक्त कोणीही नाही. मी तुम्हाला सांगू इच्छिते, की तुम्ही तुमचे डोळे उघडा आणि खोट्या राष्ट्रवादी तथा खोट्या देशभक्तांना ओळखा. पूर्ण देश आणि काँग्रेस तुमच्या संघर्षात तुमच्या बरोबर आहे. त्यांनी हरिवंशराय बच्चन यांची 'अग्निपथ' कवितेतील ओळी वाचून तरुणांना दृढता आणि शांततापूर्वक संघर्ष करण्याचे आवाहन केले. प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) म्हणाल्या, या कवितेच्या शीर्षकाचे नाव योजनेला दिले गेले आहे, जे तरुणांना उद्ध्वस्त करुन टाकेल.
ही योजना सैन्याला नष्ट करेल. या सरकारचा उद्देश ओळखा. तुमच्या संघर्षात पूर्ण देश तुमच्या बरोबर आहे. त्या म्हणाल्या, लोकशाही पद्धतीने सत्य आणि अहिंसाच्या मार्गाने हे सरकार उलथवून टाका. सत्याग्रहामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, की केंद्र सरकार गरीब आणि तरुणांसाठी नव्हे तर मोठ्या उद्योगपतींसाठी काम करित आहे. ही योजना देशातील तरुणांना मारून टाकेल, सैन्याचा शेवट करेल. कृपया या सरकारचा हेतू पाहा आणि त्यास उलथवून टाका. असे सरकार सत्तेत आणा जे देशाचा विचार करते आणि देशाची संपत्तीचे संरक्षण करते. मी तुम्हाला शांततापूर्ण प्रदर्शन करण्याचे आग्रह करत आहे. विरोध करा, मात्र थांबू नका, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) उतरलेल्या तरुणांना केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.