नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण आर्थिक घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणातील चार्जशीटमध्ये ईडीनं प्रियांका गांधी यांचं नाव नोंदवलं आहे. यामुळं प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी दिल्लीच्या एका रिअल इस्टेट एजंटकडून हरयाणात भूखंड खरेदी प्रकरण चर्चेत आलं आहे. (Priyanka Gandhi problems will increase ED filed name in charge sheet in Haryana land case)
ईडीचं या प्रकरणात म्हणणं आहे की, ज्या इस्टेट एजंटकडून प्रियांका आणि रॉबर्ट वड्रा यांनी जमिनीचा खरेदी व्यवहार केला. त्याच एजंटनं एनआरआय बिझनेसमन सीसी थम्पी या व्यक्तीलाही भूखंड विकले आहेत. त्यामुळं वड्रा आणि थम्पी यांचे अनेक काळापासून आर्थिक हितसंबंध आहेत. हे मोठं आर्थिक घोटाळ्याचं प्रकरण आहे. जे हत्यारांचा डिलर फरार संजय भंडारी याच्याशीसंबंधीत आहे. (Marathi Tajya Batmya)
भंडारी याची मनी लॉन्ड्रिंग, परदेशी चलन आणि काळा पैसा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गोपनियता अधिनियमांतर्गत अनेक एजन्सीज चौकशी करत आहेत. सन २०१६ मध्ये चौकशीच्या भीतीनं तो भारत सोडून ब्रिटनमध्ये स्थायिक झाला आहे.
पहिल्यांदाच चार्जशीटमध्ये आलं प्रियांका गांधींच नाव
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, थम्पीवर ब्रिटिश नागरिक सुमीत चढ्ढासोबत भंडारीकडून गुन्हा करुन घेण्यास मदत केल्याचा आरोप आहे. ईडीनं या प्रकरणाशी संबंधित पहिल्या चार्जशीटमध्ये थम्पीच्या निकटवर्तीय म्हणून रॉबर्ड वड्रा यांचं नाव घेतलं होतं. पण पहिल्यांदाच कोर्टात दाखल करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये प्रियांका गांधींच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
चार्जशीटमध्ये आरोप काय?
चार्जशीट आर्थात आरोपपत्रात आरोप करण्यात आला की, एचएल पहवा यांनी रॉबर्ट वड्रा आणि थम्पी या दोघांना हरयामध्ये भूखंड विकले. या खरेदी प्रकरणात बेहिशोबी पैसा देण्यात आला. तसेच वड्रा यांनी जमिनीच्या खरेदीसाठी पूर्ण पैसे दिले नाहीत.
पहवा या एजंटनं २००६ मध्ये प्रियांका गांधी शेतजमिन विकली आणि पुन्हा २०१० मध्ये त्यांच्याकडून ती जमीन खरेदी केली. या व्यवहारात रॉबर्ट वड्रा आणि प्रियांका गांधी या पती-पत्नीला यामध्ये ओरोपी दाखवण्यात आलेलं नाही. पण थम्पी आणि वड्रा यांच्यामधील आर्थिक हितसंबंध दाखवण्यासाठी जमिनीच्या खरेदी-विक्रीचा उल्लेख करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.