Rahul Gandi|Priyanka Gandhi|Smriti Irani Esakal
देश

Priyanka Gandhi: स्मृती इराणी पुन्हा गांधींना नडणार? अमेठीतील पराभवानंतर भाजप पुन्हा 1999 चा फॉर्म्युला वापरणार

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले. इतकेच नव्हे तर यामध्ये भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यात स्मृती इराणींसह अनेक केंद्रीय मंत्री हरले.

दुसरीकडे यावेळी वायनाड आणि रायबरेलीतून विजय मिळवल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहे.

अशातच वायनाडमधून प्रियंका गांधी यांना लढत देण्यासाठी भाजप 1999 चा फॉर्म्युला वापरत आक्रमक नेत्या स्मृती इराणी यांना तिथून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

काय आहे 1999 चा फॉर्म्युला?

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी दोन्हीकडे विजय मिळवला होता.

मात्र, यामध्ये कामयमच आपल्या धक्कादायक निर्णयासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपने सुषमा स्वराज यांना बेल्लारीतून उमेदवारी देत ही निवडणूक चुरशीचे केली होती.

आता वायनाडमध्येही भाजप स्मृती इराणींना तिकिट देत प्रियंका गांधीचा मार्ग खडतर करण्याची शक्यता आहे. याबाबतची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपचा आक्रमक चेरहा

गेली 10 वर्षे केंद्रात मंत्रिपद भूषविलेल्या स्मृती इराणी भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जातात. 2019 मध्ये राहुल गांधी यांच्या पराभव करत त्यांनी गांधी परिवाराचा बालेकिल्ला हिसकावला होता.

मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने केएल शर्मा या सामान्य कार्यकर्त्याला अमेठीतून विजयी करत मागच्या पराभवाचा बदला घेतला होता.

काँग्रेसची कामगिरी

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी आक्रमक पावित्रा घेत भाजपला शिंगावर घेतले. यासाठी त्यांंनी भारत जोडो यात्रा, भारत न्याय यात्रा काढत भाजपला झोडपले. परिणामी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागांवर विजय मिळवला.

यावेळी काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत देशभरात अनेक ठिकाणी अवघड वाटणाऱ्या जागा जिंकल्या आहेत. यासह विरोधी पक्षांनी चांगली कामगिरी केल्याने संसदेत भाजपच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT