नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. भारतात दोन कंपन्या लस उत्पादक आहेत तसेच 16 जानेवारी रोजी भारतात लसीकरणास (Vaccination in India) सुरुवात करण्यात आली होती. मात्र, तरीही भारतात अद्याप लसीकरणाची प्रक्रिया रखडलेली दिसून येत आहे. मोठी लोकसंख्या सध्या लसीकरणापासून वंचित आहे. यासंदर्भातच आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटलंय की, आपण जगातील एक सर्वांत मोठा लस उत्पादक देश आहोत. मात्र तरिही अद्याप एकूण लोकसंख्येपैकी फक्त 3.4 टक्के लोकांनाच लस मिळाली आहे. भारतातील या संभ्रमित आणि अनिश्चित लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी कोण जबाबदार आहे? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे. (Priyanka Gandhi reminded PM Modi of his announcement about vaccination drive)
त्यांनी यासंदर्भातील ट्विटमध्ये एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी लसीकरणासंदर्भातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलंय की, 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित करताना घोषणा केली होती की, पुढील वर्षांपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकांच लसीकरण झालेलं असेल. आता 2021 चा मध्य आला आहे, अर्धं वर्ष सरलं आहे. सध्या लसीकरणाचा दर हा 1.9 दशलक्ष प्रतिदिन इतका आहे. जर आपल्याला ते ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला 7 ते 8 दशलक्ष लसीकरण दररोज करणं आवश्यक आहे. मोदी सरकारने याची सर्व आवश्यक ती जबाबदारी घ्यायला हवी. पण जसजशी करोनाची दुसरी लाट देशात सुरू झाली, तसं केंद्र सरकारने ही जबाबदारी थेट राज्य सरकारांकडे द्यायला सुरुवात केली. जर्मनी, अमेरिका या देशांनी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा स्वीकार केला. तिथे केंद्र सकरारने लसी खरेदी केल्या आणि राज्यांना त्या लसी फक्त वितरीत करण्याची जबाबदारी दिली. पण मग मोदी सरकारने असं का केलं नाही? याला जबाबदार कोण? असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.