sanjay singh Sakal
देश

Sanjay Singh: मद्य घोटाळ्यात संजय सिंह यांनी कोट्यवधींची माया जमवल्याचे पुरावे?; ईडीचा दावा

आपचे नेते संजय सिंह यांनी ईडीनं नुकतीच अटक केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संजय सिंह यांनी दिल्लीच्या कथीत मद्य घोटाळ्यातून कोट्यवधींची माया जमवल्याचे पुरावे आपल्याकडं असल्याचा दावा ईडीनं केला आहे. या प्रकरणात त्यांना नुकतीच अटक झाली आहे. सुत्रांच्या माहितीमुळं याप्रकरणात आता आणखीनच पेच वाढणार आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Probe agency ED has proof Sanjay Singh got crores in Delhi liquor scam)

दिल्लीतील आता रद्द करण्यात आलेलं दिल्लीचं मद्य धोरण तयार करण्यात संजय सिंह यांचा प्रामुख्यानं सहभाग होता, त्यांना दिनेश अरोरा यांनी कोट्यवधी रुपये देऊ केले आहेत, याचे पुरावे आमच्याकडं आहेत, असं ईडीनं म्हटल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं दिलं आहे. (Latest Marathi News)

संजय सिंह यांना ईडीकडून अटक

सन 2021-22 च्या दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात राज्यसभा खासदार संजय सिंह यांना बुधवारी ईडीनं अटक केली. आम आदमी पार्टीचा तिसरा सर्वोच्च नेता एका केंद्रीय एजन्सीने ताब्यात घेतल्यानं दिल्लीच्या सत्ताधारी पक्षाला अर्थात आपला मोठा धक्का बसला आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित प्रकरणात अटक झालेले संजय सिंह हे आपचे हायप्रोफाईल नेते आहेत.

मोदींमध्ये अस्वस्थता

संजय सिंह यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यावरून, "मोदींमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे, निवडणुकीपर्यंत ते आणखी अनेक विरोधी नेत्यांना अटक करतील," असं आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तर अटकेपूर्वी रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओ संदेशात संजय सिंह म्हणतात की, ईडी कोणत्याही पुराव्याशिवाय जबरदस्तीनं आपल्याला अटक केली आहे. (Marathi Tajya Batmya)

"मला मरणं मान्य आहे पण झुकणे नाही. मी अदानींचे घोटाळे उघडकीस आणले आणि ईडीकडे अनेक तक्रारी केल्या, पण अदानींवर कोणतीही कारवाई झाली नाही. भविष्यातही मी अदानींविरोधात बोलत राहीन. आम्ही केजरीवालांचे सैनिक आहोत, अत्याचाराला तोंड देत मागे हटणार नाही," असं सिंह यांनी व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT