देशात एकीकडं हनुमान चालिसा वाद सुरु असतानाच आता प्रभू राम आणि रावणाबाबतचं एक प्रकरण समोर आलंय.
देशात एकीकडं हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), मस्जिद भोंगा वाद सुरु असतानाच आता प्रभू राम आणि रावणाबाबतचं एक प्रकरण समोर आलंय. पंजाबमधील फगवाडा (Punjab Phagwara) याठिकाणची लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (Lovely Professional University) सध्या वादात सापडलीय. येथील एका सहाय्यक महिला प्राध्यापकानं भगवान राम यांच्याविरोधात अपमानजनक भाषेचा वापर करत अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलंय. तसंच यासंबंधीचा ऑडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर संतापजनक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.
गुरसंग प्रीत कौर (Gursang Preet Kaur) असं या प्राध्यापिकेचं नाव आहे. लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्राध्यापिका गुरसंग प्रीत कौर यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप (Audio Clip) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच सहायक प्राध्यापिकेला विद्यापीठ प्रशासनानं बडतर्फ करावं, अशी मागणीही अनेकांनी लावून धरलीय. यानंतर विद्यापीठ प्रशासनानं शनिवारी अपशब्द वापरल्याप्रकरणी प्राध्यापिकेला बडतर्फ करण्याचा आदेश जारी केलाय.
गुरुसंग प्रीत कौरनं भगवान राम यांच्याबद्दल अपशब्द वापरत रावण चांगला माणूस होता. पण, रामानं त्याची फसवणूक केल्याचं सांगितलंय. ती इतक्यावर थांबली नाही तर पुढं म्हणाली की, 'सीतेला पळवून नेण्याची योजना रावणाची नसून रामाची असल्याचं सांगितलंय. असं करून रामाला त्याचा शत्रू रावणाला जाळ्यात अडकवायचं होतं, असं तिनं नमूद केलंय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळं काही लोक दुखावले गेल्याचं आम्हाला समजतं. ज्यामध्ये आमचा एक फॅकल्टी सदस्य त्याचं वैयक्तिक मत मांडताना ऐकू येत आहे, असं लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीनं याबाबत निवेदन जाहीर करत म्हटलंय. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, त्यांनी केलेली मतं पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि विद्यापीठ त्यापैकी कोणाचंही समर्थन करत नाही,' असं विद्यापीठानं निवेदनात म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.