Jain Muni Kamkumar Nandi Maharaj murdered in Karnataka esakal
देश

Belgaum : जैन मुनींच्या मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत; संशयितांकडून हत्येची कबुली, मठाकडं भाविकांची रीघ

जैन मुनींची निर्घृण हत्या झाल्याचे काल (ता. ७) रात्री उघडकीस आल्याने दिवसभर नंदीपर्वत मठाकडे भाविकांची रीघ लागली होती.

सकाळ डिजिटल टीम

शुक्रवारी रात्री संशयितांनी हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिस बंदोबस्त वाढविला होता. भाविकांचा ओढा वाढणार असल्याचे संकेत होते.

चिक्कोडी : तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या (Nandi Parvat Ashram) जैन मुनींची निर्घृण हत्या झाल्याचे काल (ता. ७) रात्री उघडकीस आल्याने दिवसभर नंदीपर्वत मठाकडे भाविकांची रीघ लागली होती.

सेवक, सेविका व भाविकांना अश्रू अनावर झाले होते. मठाकडे येणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांत अश्रू दिसून येत होते. हिरेकुडीपासून नागराळकडे जाणाऱ्या रस्त्यावर नंदीपर्वत आश्रम (मठ) असून, तेथे आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज (Kamkumar Nandi Maharaj) वास्तव्यास होते.

मठाचा परिसर डोंगर कपारीत असल्याने निसर्गसंपन्न आहे. तेथे जैन श्रावक-श्राविकांची नेहमी गर्दी असते. स्वामींच्या स्वभावाबद्दल लोकांनी खूप काही सांगितले. त्यांच्यासारख्या स्वामींच्या हत्येबद्दल संताप व्यक्त करण्यात येत होता. अनेक मान्यवरांनी मठाला भेट दिली. तेथे असलेल्या सेवकांची चौकशी केली.

बहुतांश ट्रस्टीतील लोक कटकभावी येथे मृतदेह शोधमोहिमेकडे गेले होते. तरीही मृतदेह मिळाल्यानंतर तो हिरेकुडी येथे आणला जाईल, असा अंदाज बांधून भाविक सकाळपासून प्रतीक्षेत होते. शनिवारी संध्याकाळी मृतदेहाचे अवशेष सापडल्यानंतर ते तपासणीसाठी बेळगावला घेऊन गेल्याने मुनींचे अंत्यदर्शनही मिळाले नसल्याची खंत भाविक व्यक्त करत होते.

शुक्रवारी रात्री संशयितांनी हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिस बंदोबस्त वाढविला होता. भाविकांचा ओढा वाढणार असल्याचे संकेत होते. मात्र कटकभावीत मृतदेह असल्याने व त्याचे केवळ अवयव सापडल्याने भाविकांच्या संतापात भर पडली. दिवसभर मठाजवळ वाहनांची संख्या व भाविकांची संख्या वाढत होती.

दरम्यान, जैन समाजाचे विविध मठांचे मठाधीश यांनीही रायबाग तालुक्यातील घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पोलिसांसोबत चर्चा करून शोधकार्याची माहिती दिली गेली. जिल्ह्यातील मान्यवर मंडळींचीही मठाकडे व रायबाग तालुक्यातील घटनास्थळाकडे रीघ लागली होती.

मुख्य संशयिताची मठात वर्दळ

संशयित मारेकरीमधील मुख्य आरोपी हा नेहमी मठात येत असे. शेतीच्या कामावरून त्याची नेहमी वर्दळ असायची. त्यातून त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याने व पैसे परत करता येत नसल्याच्या कारणावरून त्याने मुनींची हत्या केल्याचे भाविक सांगत होते. मुख्य आरोपीने आपल्या ट्रॅक्टरचालकाला बोलावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह रायबाग तालुक्यात नेऊन त्याचे तुकडे करून कूपनलिकेत टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT