ज्या प्रेमात एकमेकांची ओढ नसते ते प्रेम थोडे अपुरेच वाटते. कारण, लग्न होऊन एकत्र राहणारे पती-पत्नी यांच्यातही एकमेकांबद्दल ओढ नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. सध्या व्हॅलेंटाईन विक सुरू असून आज प्रपोज डे आहे.
एकमेकांची वाट पाहणारे, एकमेकांची साथ देणारे प्रेमीयुगूल तसे फार कमी आहेत. पण, एकेकाळी जन्मभर एकमेकांच्या प्रेमाची वाट पाहणारे प्रेमवीरही यात मातीत होऊन गेले आहेत. त्यातीलच एक अजरामर कहानी म्हणजे ढोला आणि मारू यांची.
राजस्थानमधील नरवारच्या राजाचा मुलगा साल्हकुमार हा होता. वयाच्या तिसर्या वर्षी त्याचा विवाह जंगलू देशाचा पंवार राजा पिंगलू याची मुलगी मारवाणीशी करण्यात आला होता. त्यावेळी राजकन्येचे वय खूपच लहान होते. त्यामुळेच तिची बिदाई करण्यात आली नाही. काही काळानंतर राजकुमार मोठा झाला आणि त्याचे लग्न दुसऱ्याच एका राजकन्येशी करण्यात आले.
कारण, राजा आणि राजकुमार साल्ह यांनाही राजकन्येचा विसर पडला होता. दुसरीकडे, राजकुमारी जसजशी मोठी होत होती, तसतशी तिची साल्ह कुमारबद्दलची स्वप्ने आणि तिचे प्रेमही मोठे होत होते. ती राजकुमाराच्या आठवणीतच रमून जायची.
तिची काळजी वाटून मुलीला सासरी नेण्याबाबत अनेकदा तिच्या वडिलांनी निरोप धाडले. परंतु तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामूळे राजकुमारी मारवणीच्या वडिलांनी हुशार ढोलीवर (गावोगावी फिरणारे फिरस्ते) संदेश पोहोचवण्याचे काम सोपवले. गावोगावी जाऊन लोकगीते म्हणणे हे ढोलीचे काम होते.
चतुर ढोलीने नरवर गाठले आणि मल्हार रागातील आपल्या गाण्यांमधून राजकन्येच्या हृदयाची अवस्था कथन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या गोड आवाजाने प्रभावित होऊन राजकुमाराने ढोलीला बोलावले. मग त्याने राजकन्येच्या मनाची संपूर्ण स्थिती आणि राजकुमाराशी तिच्या लग्नाविषयी सर्व काही सांगितले.
राजपुत्राला सर्व काही आठवले होते आणि तो आपल्या राजकुमारीला भेटण्यासाठी उत्सुक होता. त्याची दुसरी पत्नी मालवणी हिने त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. पण राजकुमार आपला वेगवान उंट घेऊन राजकन्येकडे निघाला.
पहिल्यांदा त्याचा सामना उमरा-सुमरा या शत्रूशी झाला. ज्यांना साल्हकुमारला मारून राजकुमारीला मिळवायचे होती. हे दोघेही तामझाम करून शेकोटी पेटवून राजाची वाट पाहत बसले होते. जेव्हा राजकुमार साल्हकुमार राजकन्येला घेऊन तिथे आला. तेव्हा उमरने त्याला अडवले. आणि आमच्यासोबत बसून आराम करा, सरबत घेण्यास सांगितले. राजकुमाराने राजकन्येला उंटावर बसवून स्वत: खाली उतरला आणि सुगंधी, महाग सरबताचा आस्वाद घेऊ लागला.
त्याचवेळी ढोली गाणे गात होते. मारूच्या देशातून आलेला ढोली खूप हुशार होता. त्याला उमर सुमराच्या कारस्थानाची माहिती होती. ढोलीने गुप्तपणे राजकन्येला या कटाची माहिती दिली. राजकुमारीने उंटाला टाच मारली. ज्यामुळे उंट पळ लागला. राजकुमार उंटाला थांबवायला धावू लागला. तोच राजकन्या म्हणाली कि हे दोघे फसवणूक करत आहेत. लवकर उंटावर बसा, त्यांना तूम्हाला मारायचे आहे.
तिथून ते निसटले आणि राज्यात सुखरूप पोहोचले. येथे राजकन्येचे स्वागत झाले आणि ती तेथे राणी म्हणून राज्य करू लागली. तेव्हापासून आजतागायत त्याच्या नावाची आणि प्रेमाची स्तुती केली जाते.
राजस्थानमध्ये राजकुमार आणि राजकन्येची ही कथा ढोला मारूची प्रेमकथा म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे असलेल्या संस्कृतीत गाण्यातून, काव्यातून आजही ही कथा लोककथा म्हणून सांगितली जाते. असेहे ढोला मारूचे प्रेम अजरामर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.