protest against Congress State President Request of resident doctors not to give political agitation kolkata  sakal
देश

काँग्रेस प्रदेशाध्यक्षाविरोधात घोषणाबाजी; आंदोलनाला राजकीय रंग न देण्याची निवासी डॉक्टरांची विनंती

पश्‍चिम बंगालमधील सगोर दत्ता रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात कामबंद आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्‍टरांना भेटायला गेलेले काँग्रेसचे पश्‍चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष शुभंकर सरकार यांच्याविरोधात आंदोलन...

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील सगोर दत्ता रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात कामबंद आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्‍टरांना भेटायला गेलेले काँग्रेसचे पश्‍चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष शुभंकर सरकार यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी रविवारी जोरदार घोषणाबाजी केली. सरकार आणि त्यांच्यासह आंदोलनकर्त्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा ‘परत फिरा’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी निषेध केला.

रुग्णालयातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीकेवर हल्ला करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. कामाच्या ठिकाणी संरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले.

‘‘आमचे आंदोलन हे राजकीय नाही त्यामुळे येथे कोणत्याही राजकारण्याला प्रवेश नाही,’’असे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे आहे. ‘‘हा मंच आणि ही चळवळ सर्वसामान्यांची आहे, प्रशासनाने आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत त्यामुळे आपण कृपया येथून निघून जावे अशी विनंती आम्ही तुम्हाला हात जोडून करत आहोत,’’ असे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी सरकार यांना सांगितले.

डॉक्‍टरांच्या भावनांचा आदर

‘‘आम्ही येथे राजकारणी म्हणून नव्हे तर सर्वसामन्य नागरिक म्हणून आलो होतो. मात्र येथे आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या मताचा आदर करत आम्ही येथून जात आहोत. हे निवासी डॉक्टर मला माझ्या मुलांसारखे आहेत. त्यांना या आंदोलनाला कोणताही राजकीय रंग येऊ द्यायचा नाहीये,’’ असे मत सरकार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

ममतांवर टीका

‘‘सगोर दत्ता रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांवरील आणि परिचारीकेवरील हल्ला हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे राज्यातील आरोग्य व्यवस्थाही कोलमडली आहे. आर. जी. कर प्रकरणी पण हेच सिद्ध झाले होते,’’ असा आरोप शुभंकर सरकार यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT