अर्थसंकल्पी अधिवेशन
नवी दिल्ली : आरोग्य व जीवन विम्याच्या हप्त्यावर लावण्यात येणारा १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्यात यावा, या मागणीच्या समर्थनार्थ आज इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात निदर्शने केली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी तृणमूल कॉँग्रेसच्या (टीएमसी) सदस्यांनी लोकसभा व राज्यसभेमध्ये आरोग्य व जीवन विमा पॉलिसीच्या हप्त्यावर लावण्यात आलेल्या १८ टक्के जीएसटीच्या विरोधात मुद्दा उपस्थित केला होता. सर्वसामान्य लोकांचा संबंध असल्यामुळे या हप्त्यावरील जीएसटीचा दर कमी करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
याच मागणीच्या समर्थनार्थ आज संसदेच्या मकरद्वारच्या समोर इंडिया आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. विम्यावरील जीएसटी कमी करा, अशा मागणीचे फलक प्रत्येक खासदारांच्या हातात होते. या निदर्शनामध्ये काँग्रेससह टीएमसी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), डीएमके, समाजवादी पार्टी, राजद, आप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, जेएमएम, आरएसपी पक्षाच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
या निदर्शनामध्ये राहुल गांधींसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, राजदच्या मिसा भारती, जेएमएमच्या महुआ मांझी, डीएमकेचे ए. राजा, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, रजनी पाटील, छत्रपती शाहू महाराज, मुकुल वासनिक उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.