providing free education to poor children retired officer husband cherished service of his late wife Sakal
देश

Education : गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याचे अविरत कार्य

दिवंगत पत्नीचा सेवाभाव निवृत्त अधिकारी पतीने जपला

सकाळ वृत्तसेवा

जम्मू : झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण देण्याचे एका निवृत्त शिक्षिकेने सुरू केलेले महत्कार्य त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पतीने सुरू ठेवले आहे. रोमेशचंद्र खजुरिया असे पतीचे नाव असून ते काश्‍मीर प्रशासनातील एक सेवानिवृत्त अधिकारी होत.

कांचन शर्मा असे दिवंगत पत्नीचे नाव असून त्यांनी १९ वर्षापूर्वी झोपडपट्टीतील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. शिक्षक दिनानिमित्त खजुरिया यांनी पत्नी कांचन शर्मा यांच्या आठवणींना उजाळा दिला. कांचन शर्मा यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यांनी मराठा नगर येथे संगीत विद्या केंद्र सुरू केले होते.

खजुरिया हे २०१२ रोजी कायदा आणि संसदीय व्यवहार खात्याचे सहायक सचिव या पदावरून निवृत्त झाले. पत्नीच्या निधनानंतर शाळा सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला. सरकारी शाळेतून निवृत्त झाल्यानंतर कांचन शर्मा यांनी शाळा सुरू केली.

सध्या ६० पेक्षा अधिक मुले शिक्षण घेत आहेत. कांचन यांना ‘सुपर टिचर’ म्हणून ओळखले जायचे आणि निवृत्तीमुळे अध्यापनाचे राहिलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी शाळा सुरू केली. गरीबी कमी करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे, यावर त्यांचा ठाम विश्‍वास होता.

झोपडपट्टीतील गरीब मुलांना शिक्षण देणे हेच ध्येय बनले असून याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे खजुरिया म्हणाले. गेल्या काही वर्षात झोपडपट्टीतील शेकडो मुलांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी चार जणांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि अनेक जण उच्च शिक्षण घेत आहेत.

आम्ही पाचवीपर्यंत शिक्षण देतो आणि त्यानंतर मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी आमचे शिक्षक पालकांच्या भेटीगाठी घेतात आणि त्यांना पुढील शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे सांगतात आणि माध्यमिक शाळेत प्रवेश घ्यावा याबाबतची हमी घेतात.

प्रारंभीच्या काळात झोपडपट्टीतील मुलांना शाळेत आणण्यासाठी माझ्या पत्नीचे बरेच कष्ट घेतले, असे खजुरिया म्हणाले. आम्ही कोणाच्याही मदतविना शाळा चालवत आहोत. यासाठी खिशातून पैसे खर्च करत आहोत. मानवतेच्या भावनेतून याकडे सेवा म्हणून पाहतो, असे ते म्हणाले.

शाळेतील शिक्षिका अनुराधा म्हणतात, की शाळेतील मुलांना आणि आम्हाला शर्मा यांची आठवण येते. त्यांच्या पतीने जबाबदारी स्वीकारल्यानंतर शाळा कोणत्याही अडचणीशिवाय सुरू आहे. सुरवातीपासूनच आपण या ठिकाणी कार्यरत आहेत.

दिवंगत शर्मा यांनी सांगितलेल्या मार्गावर आणि सूचनांनुसार आम्ही काम करत असून मुलांना सक्षम करण्याचे काम केले जात आहे. शाळेतील अन्य शिक्षिका मोनिका कुमारी म्हणाल्या, आपण गेल्या सात वर्षांपासून शाळेत काम करत आहोत. विद्यार्थी हुशार आहेत आणि ते कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. विविध क्रीडा स्पर्धेत देखील चांगली कामगिरी केली असून त्यांनी पहिला पुरस्कार देखील मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT