देश

कर्नाटक CID ची धडक कारवाई, भाजप महिला नेत्याला पुण्यातून अटक

भाजपा नेत्या दिव्या हागारगी या ज्ञान ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भाजपा नेत्या दिव्या हागारगी या ज्ञान ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा आहेत.

पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणी भाजपच्या महिला नेत्याला कर्नाटक सीआयडीने पुण्यातून अटक केली आहे. पीएसआय भरती घोटाळा प्रकरणी दिव्या हागारगी यांना गुरुवारी रात्री पुण्यात अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी दिली आहे. गुलबर्गा येथील कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. आरोपींनी त्याआधी अटपूर्व जामीनासाटी अर्ज केला होता. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.

भाजपा नेत्या दिव्या हागारगी या ज्ञान ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक काही शिक्षिका आणि कनिष्ठ अभियंता मंजुनाथ मेळकुंडी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींना एक आठवड्याच्या आत तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासही सांगण्यात आलं होतं. दरम्यान, पीएसआय पदासाठी प्रत्येक उमेदवाराकडून ६० लाख रुपयांची लाच घेण्याचा करार झाला होता. तसंच पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याची माहिती सीआयडीच्या तपासातून समोर आली होती.

याप्रकरणात सीआयडीने याआधी एन व्ही सुनीलकुमारला या प्रकरणी अटक केली आहे. ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ब्लूटूथ डिव्हाइस वापरून त्याने परीक्षा दिली होती. तो पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. याच प्रकरणात आधी अटक केलेल्या रुद्रगौंडा पाटील याने दिलेल्या माहितीच्या मदतीने तपास करण्यात आला. सुनीलकुमार याचाही गैरप्रकारात सहभाग असल्याचं आढळून आल्यानंतर त्याला सीआयडीने ताब्यात घेतलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT