Puja Khedkar sakal
देश

Puja Khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला! कोणत्याही क्षणी होणार अटक

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : युपीएससी परीक्षेत घोटाळा करुन उमेदवारी मिळवणाऱ्या पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्लीच्या पटियाला कोर्टानं गुरुवारी फेटाळला. त्यामुळं पूजाला मोठा झटका बसला असून तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कालच पूजा खेडकरवर युपीएससीनं कठोर कारवाई करत तिची उमेदवारी रद्द केली होती. तसंच भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यापासून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

पूजा खेडकरचे अनेक घोटाळे समोर आल्यानंतर युपीएससीनं तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसंच तिला आपली बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. पण पूजानं मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिलं नव्हतं. तसंच पुणे पोलिसांनी देखील देखील पूजाला तीनदा समन्स पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण याची देखील तिनं दखल घेतली नव्हती. दरम्यान, पूजानं दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती त्याचा निकाल कोर्टानं राखून ठेवला होता.

आज हा निकाल जाहीर करताना पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळं आता पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तिला शोधून काढून अटकेची कारवाई करावी लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

पूजा खेडकरनं आयएएस पद मिळवण्यासाठी अनेक कारनामे केले होते. एक-दोन नव्हे तर तब्बल तीन दिव्यांग प्रमाणपत्र तिनं मिळवली. तसंच यूपीएससी परीक्षेच्या जास्त संधी मिळाव्यात, यासाठी नाव बदलून तिनं तीनदा परीक्षा दिल्या होत्या. यासाठी तिनं ओबीसी आरक्षणाचा लाभही घेतला. यासाठी आपण आई-वडिलांपासून वेगळं राहात असल्याचा बनाव करुन तिनं यासंबंधीची खोटी कागदपत्रं सादर केली होती. तिची ही सर्व प्रकरणं एकामागून एक बाहेर आली होती.

सुरुवातीला सोशल मीडियामधून पूजा खेडकर संबंधित एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये एका खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावून ती फिरत असल्याचं यात म्हटलं होतं. याचे फोटो देखील समोर आले होते. प्रशिक्षणार्थी आयएएस असताना असं करणं नियमात बसत नसतानाही तिनं हा प्रकार केला. इतकंच नव्हे तर तिनं उद्दामपणे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण काळात एका अधिकाऱ्याची केबिन बळकावत तिथं आपलं सामान नेऊन ठेवलं होतं.

तिच्या या सर्व गैरप्रकारांबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडं तिची लेखी तक्रारही केली होती. या तक्रारीची प्रतही नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर याप्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत माध्यमांनीही खोलात जाऊन रिपोर्टिंग केल्यानंतर तिचे अनेक कारनामे समोर आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT