Latest Marathi News Live Update Esakal
देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Latest Marathi News 2024: देश-विदेश आणि राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.

सकाळ वृत्तसेवा

अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारते- अंजली दमानिया

''चॅलेंज मंजूर आहे । अजित पवारांनी नार्को टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमांमधून कळले. पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फ़ोन केला नाही, तर जसे अजित पवार म्हणाले,की “मी गप्प घरी बसावं आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा” हे मला पूर्णपणे मान्य. कधी करणार नर्को टेस्ट ते लवकरात लवकर कळवा'' असं प्रत्युत्तर अंजली दमानिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर रायगडमध्ये गुन्हा दाखल

अल्पवयीन आरोपीच्या आईची पुणे पोलिसांकडून चौकशी

पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आईची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. डॉक्टरला धमकावल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे.

मी नार्को टेस्टला तयार- अजित पवार

मी नार्को टेस्टला तयार आहे, परंतु त्यानंतर त्यांनी (अंजली दमानिया) घरीच बसून रहावं, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

भाजप उद्या दिवसभर जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन करणार

भाजप उद्या दिवसभर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची माहिती दिली. शालेय शिक्षणात मनुस्मृती शिकवण्याचा घाट सरकारनं घातला आहे, त्याविरोधात आव्हाडांनी आज चवदार तळे परिसरात मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतला. यावेळी त्यांच्याकडून मनुस्मृतीच्या पोस्टरवर छापण्यात आलेला बाबासाहेबांचा फोटो अनवधानानं फाडला गेला. त्यामुळं आव्हाड सध्या टीकेचे धनी झाले आहेत. पण आपल्याकडून चुकून घडलेल्या या घटनेवर त्यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे.

उद्यापासून मध्य रेल्वेचा ६२ तासांचा मेगाब्लॉक; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द होणार

उद्या मध्य रेल्वेचा ६२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं लांब पल्ल्यांच्या गाड्यांसह मुंबईत या मार्गावरुन धावणाऱ्या काही लोकल गाड्याही रद्द केल्या जाणार आहेत.

डोंबिवली पाठोपाठ कल्याण मध्ये देखील आग

डोंबिवली पाठोपाठ कल्याण मध्ये देखील आगिची घटना. कल्याण पूर्वेत इमारतीत भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. दुर्गा प्लाझा इमारतीत लागली आग. आडीवली-ढोकळी परिसरात आगीची घटना घडली आहे. मीटर रूममध्ये आग लागल्याची स्थानिकांची माहिती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

डोंबिवलीतील सिद्धी चायनीज हॉटेलला आग

डोंबिवली पूर्व येथील सिद्धी चायनीज हॉटेलला आग. सिलेंडरच्या स्फोटामुळं आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत 4 जण जखमी झाले आहेत, तर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण, विशाल अग्रवाल यांच्या जामिनावर १ जूनला होणार सुनावणी

कल्याणीनगर अपघाताच्या गुन्ह्यात विशाल अग्रवाल याच्या जामीन अर्जावर १ जूनला होणार सुनावणी होणार आहे. पुणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. विशाल अग्रवाल याने जामिनासाठी अर्ज केला होता.

भांडारकर रस्त्यावरील इमारतीमधील कार्यालयास आग

भांडारकर रस्त्यावरील इमारतीमधील कार्यालयात आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशामक दलाचे जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

भांडारकर रस्त्यावरील करण सोहेल या सात मजली इमारतीत गच्चीवर पत्रा आणि स्लायडिंगचे बांधकाम असलेल्या कार्यालयात आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी एक वाजता मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाकडून एरंडवणा, कोथरुड येथील वाहन आणि पाण्याचा टँकर रवाना करण्यात आला. जवानांनी कार्यालयात कोणी अडकले नसल्याची खात्री करुन सातव्या मजल्यावर जात होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा केला. सुमारे वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली.

Sanjay Raut: मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊतांना पाठवली नोटीस 

प्रत्येक मतदार संघात मुख्यमंत्री शिंदे यांनी 25-30 कोटी दिले असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. हा आरोप केल्यानंतर शिंदे यांनी राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Tejashwi Yadav: 'यावेळी बिहारची जनता भाजपला धडा शिकवेल'; आरजेडी नेते तेजस्वी यादव यांची टीका

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, "आम्ही त्यांना 40 पैकी 39 खासदार दिले. आम्ही त्यांना गुजरातपेक्षा जास्त खासदार दिले पण गुजरातला सर्व निधी मिळतो आणि बिहारला काहीच मिळत नाही. आता असे होणार नाही, यावेळी बिहारची जनता या लोकांना धडा शिकवेल."

Mani Shankar Aiyar Statement: मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर भाजपची काँग्रेसवर टीका

भाजपने काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या मौनावर भाजपने प्रश्न उपस्थित करत त्यांनी बोलावे, असे सांगितले. भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेत बोलताना गौरव भाटिया म्हणाले की, जवाहरलाल नेहरूंच्या काळात भारताची ४३ हजार चौरस किलोमीटर जमीन चीनने बळकावली होती. ही जमीन अजूनही चीनच्या ताब्यात आहे. मणिशंकर अय्यर यांनी चीनला क्लीन चिट दिली. राहुल गांधींच्या संमतीशिवाय हे होऊ शकते का? चीनवर हल्ला करणे थांबवा.

Amol Mitkari: स्टंट बाजीच्या नादात आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटा फोडला- अमोल मिटकरी

स्टंट बाजीच्या नादात आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटा फोडला, असा आरोप राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केलाय.

Pune News: ससूनमधील दोन डॉक्टरांचे निलंबन होण्याची शक्यता

ससून हॉस्पिटमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हरनोर यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपर्यंत यासंदर्भातील पत्रक निघू शकते.

Pune News: पुण्यातील भांडारकर रोडवर असणाऱ्या एका इमारतीला आग

पुण्यातील भांडारकर रोडवर असणाऱ्या एका इमारतीला आग लागली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीचे कारण समजू शकलं नाही. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Anurag Thakur takes dig at Kejriwal : तब्येत ठीक नाही तर मग ऊनात प्रचारसभा कशा घेता? अनुराग ठाकूर यांची टीका

केजरीवाल यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागितला होता. यावर भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी टीका केली आहे. तब्यत ठीक नाही तर मग ४७ अंश सेल्सियन तापमानात सभा कशा घेतात असा सवाल त्यांनी केला.

Mumbai Local News: तब्बल 18 तासानंतर पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू

पालघर- तब्बल 18 तासानंतर पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू झाल्या आहेत. ट्रॅक नंबर एक वरून अप आणि डाऊन मार्गावरील लांब पल्यांच्या गाड्यांची वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली आहे. पण, लोकल सेवा अजूनही ठप्पच आहे . मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर वरून गुजरातच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांचे चवदार तळ्यावर आंदोलन

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नाशिकमधील चवदार तळ्यावर आंदोलन करत आहेत. मनुस्मृतीच्या विरोधात त्यांचे हे आंदोलन आहे.

Bihar Heat: बिहारमध्ये अनेक विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

बिहारमधील एका शाळेत अनेक विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जितेंद्र आव्हाड महाड येथील चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन करणार

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारच्या विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.

जितेंद्र आव्हाड महाड येथील चवदार तळ्याजवळ आव्हाड करणार मनुस्मृतीचे दहन करणार आहेत. चवदार तळ्याच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आव्हाड टिपणीसांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. महाड पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना १८८ च्या अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे.

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवालांची याचिका कोर्टाने फेटाळी, पुन्हा तिहारमध्ये जाणार

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही. केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनाला ७ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. केजरीवाल यांना आता २ जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार.

मुख्यमंत्र्यांना नियमित जामीनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिलेले असल्याने ही याचिका सुप्रीम कोर्टात राखता येणार नाही अस सांगत सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने अर्ज स्विकारण्यास नकार दिला.

Mumbai Local: मुंबई उपनगरीय लोकल दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द

28/05/2024 रोजी पालघर यार्ड येथे पॉईंट क्रमांक 117/118 वर मालगाडीच्या 6 वॅगन आणि 1 BVG रुळावरून घसरल्यामुळे, मुंबई-सुरत विभागाच्या UP लाईनवर परिणाम झाला आहे. रुळावरून घसरल्यामुळे या मार्गावर काही गाड्यांवर परिणाम झाला असून, 41 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर 18 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या असून 9 गाड्या वळवण्यात आल्या आहेत आणि 22 गाड्यांचे वेळापत्रक आत्तापर्यंत बदलण्यात आले आहे. डहाणू रोडला जाणाऱ्या आणि जाणाऱ्या मुंबई उपनगरीय लोकल दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पालघर यार्डातील बाधित मुंबई-सुरत सेक्शनची अपलाइन लवकरच पूर्ववत केली जाईल: पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ

Delhi Fire: दिल्लीतील पार्किंगमध्ये अनेक गाड्या जळून खाक

दिल्लीतील मधु विहार परिसरात मंडवली पोलीस स्टेशनजवळील पार्किंगला लागलेल्या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. काल रात्री १.१७ च्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आली आहे.

Indian Werstlers: भारतीय आर्म रेसलर टीमने सुवर्णपदकासह सात पदके जिंकली

उझबेकिस्तानातील ताश्कंद येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय आर्म रेसलर टीमने एक सुवर्ण आणि सहा कांस्यांसह सात पदके जिंकली.

Loksabha Election 6th Phase: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात महिला मतदारांची बाजी

25 जून रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान केलेल्या पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 3 टक्क्यांनी अधिक असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.

Election Commision: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आयपीएस अधिकाऱ्याचे निलंबन

केंद्रीय निवडणूक आयोगाने ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे विशेष सचिव असलेले आयपीएस अधिकारी डी.एस कुटे यांचे निलंबन केले आहे. कुटे यांच्यावर त्यांनी राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यावर थेट अवाजवी प्रभाव टाकल्याचा आरोप आहे.

NIA: बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांच्या तस्करी प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशाच्या उत्तर-पूर्व सीमेवरून बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांच्या तस्करी प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक केली. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, जलील मिया, जो त्रिपुराचा रहिवासी आहे, त्याला अटक करण्यात आली आहे.

Loksabha Election: लोकसभेच्या प्रचार तोफा आज थंडावणार

Latest Marathi News Live Update : पुण्यातील कल्याणीनगर मध्ये अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघात प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत आहेत.

लोकसभा निवडणुका आता शेवटाकडे आल्या आहेत. यामध्ये 1 मे रोजी सातव्या टप्प्यातील जागांवर मतदान होणार असल्याने प्रचाराला जोर चढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT