Rahul Gandhi on Pune Porsche Accident Esakal
देश

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Rahul Gandhi on Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेल्या अल्पवयीन आरोपींला जामीन मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणात अल्पवयीन आरोपींला जामीन मिळाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणात नागरीक चांगलेच संतापले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

दरम्यान याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बाल न्याय मंडळाच्या नुकत्याच दिलेल्या आदेशावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. बाल न्याय मंडळाच्या बोर्डाने पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपीला शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगितले आहे. यावरून त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत 'नरेंद्र मोदी दोन भारत निर्माण करत आहेत, जिथे न्याय देखील संपत्तीवर अवलंबून आहे' असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. यासंबधीचा व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मिडीया एक्सवर पोस्ट केला आहे.

काय म्हणालेत राहुल गांधी?

जेव्हा बस, ट्रक ड्रायव्हर, ओला, उबर ड्रायव्हर यांच्याकडून कधी चुकून अपघात झाला त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांची शिक्षा आणि त्यांचं काम काढून घेतलं जातं. पण जर श्रींमत घरातील १६ ते १७ वर्षाचा मुलगा पोर्शे गाडी दारू पिऊन चालवतो आणि दोघांची हत्या करतो. तेव्हा त्याला सांगतात निंबंध लिही. हाच निंबंध बस, ट्रक ड्रायव्हर, ओला, उबर ड्रायव्हर यांच्याकडून का लिहून घेतला जात नाही.

नरेंद्र मोदींना विचारण्यात आले दोन भारत बनत आहेत, क अरबपतींचा आणि दुसरा गरीबांचा तेव्हा त्यांचं उत्तर आम्ही सर्वांना गरीब बनवू, प्रश्न न्यायाचा आहे. गरींबाना, श्रींमंताना दोघांना न्याय मिळाला पाहिजे. न्याय सर्वांसाठी समान असला पाहिजे. यासाठी आम्ही लढत आहोत. अन्यायाविरोधाच लढत आहोत, असंही पुढे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

बाल न्याय मंडळाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगताना दोन जणांचा बळी घेणाऱ्या कार अपघातात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला होता. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, प्रौढ आरोपी म्हणून त्याच्यावर खटला चालवण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी घेणार आहेत. या आरोपीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले, त्यानंतर काही तासांनंतर त्याला जामीन मंजूर केला. प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट देऊन वाहतूक नियमांचा अभ्यास करून १५ दिवसांत मंडळाला सादरीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलाने चालविलेल्या पोर्शे कारने रविवारी पहाटे पुणे शहरातील कल्याणी नगर भागात दुचाकी वाहनाला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी मृतांची नावे आहेत. ते मूळचे मध्य प्रदेशचे होते.

कोझी व ब्लॅक हॉटेलच्या मालकासह व्यवस्थापकाला चार दिवसांची पोलिस कोठडी

कल्याणीनगर भागात भरधाव मोटार चालवून अल्पवयीन मुलाने दोघांचा बळी घेतल्या प्रकरणात कोझी हॉटेलचे मालक, व्यवस्थापक आणि हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी हा आदेश दिला. 'कोझी’ हॉटेलचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, हॉटेल ‘ब्लॅक’चे मालक संदीप रमेश सांगळे असे कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये मद्य पुरविल्याप्रकरणी दोन्ही हॉटेलमालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT