Punjab aap mla lal singh ugoke who defeated Punjab Cm Channi mother wont give up sweepers job  
देश

मुलानं निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना पाडलं; सफाई कर्मचारी आई पुन्हा कामावर

सकाळ डिजिटल टीम

नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल समोर आले आहेत, आप (AAP) ने पंजाबमध्ये विजय मोठा मिळवला आहे. या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सामान्य कुटुंबात वाढलेले आपचे उमेदवार लाभसिंग उगोके यांनी, त्यांनी मोठा उलटफेर करत कॉंग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पराभव केला. उगोके यांना निवडणूकीत मोठा विजय मिळवला असेल, परंतु त्यांची आई मात्र सफाई कामगार म्हणून नोकरी सोडण्यास तयार नाही.

आपचे आमदार लाभ सिंह यांची आई बलदेव कौर या सरकारी शाळेत कंत्राटी सफाई कामगार आहेत. शुक्रवारी त्या झाडू घेऊन ड्युटीसाठी पोहोचल्या तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. एकच दिवस आधी, त्यांच्या मुलाने काँग्रेसच्या मुख्यमंत्री उमेदवाराचा 37,558 च्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.

बलदेव कौर म्हणाल्या, "माझ्या मुलाच्या विजयानंतर किमान एक दिवस तरी मी कामावर येणार नाही, असे त्या सर्वांना वाटत होते. पण मी स्पष्ट केले की माझा मुलगा आमदार झाला आहे, मी नाही. मी अजूनही कंत्राटी सफाई कामगार आहे. मी माझी नोकरी का सोडू?" त्या गेल्या 22 वर्षांपासून बर्नाळा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी उगोके येथील शाळेत कार्यरत आहे. त्यांची सेवा नियमित न केल्याने त्यांचा सरकारवर रोष आहे. त्या म्हणाल्या की, सेवा नियमित करणासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु प्रत्येक वेळी तो फेटाळण्यात आला.

हेच माझ्या उपजीविकेचं साधन होतं

बलदेव याांचे वय आता 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. आपण नोकरी सोडणार नाही, असे स्पष्टपणे आपल्या आमदार मुलाला सांगितले असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणाल्या की, “मी जे करत आहे त्याचा मला अभिमान आहे. आमचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी धडपडत असताना माझी नोकरी ही कमाईचा एक महत्त्वाचा स्रोत होता.

बलदेव कौर यांच्या घरातून तिच्या कुटुंबात असलेली नम्रता दिसून येते. सीएम चन्नी यांच्या विरोधात 'खरे विरुद्ध नकली गरीब' हा निवडणुकीचा मुद्दा बनवण्यात लाभ सिंह यशस्वी ठरले आहेत. बलदेव कौर यांचे पती दर्शन सिंह यांनी आयुष्यभर मजूर म्हणून काम केलं पण नुकतेच डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी काम करणे बंद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT