Punjab cm Bhagwant Mann announces anti corruption helpline says it will be his personal WhatsApp number  
देश

भगवंत मान यांचा भ्रष्टाचाराविरोधात मोठा निर्णय; देणार पर्सनल व्हॉट्सअ‍ॅप नंबर

सकाळ डिजिटल टीम

पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यात भ्रष्टाचार मोठी मोहिम सुरू केली असून त्यांनी राज्यातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी आज मोठा निर्णय घेतला आहे. मान यांनी भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनी राज्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन (anti-corruption helpline number) क्रमांक जारी केला जाईल, अशी घोषणा आज केली. या हेल्पलाईनच्या माध्यमातून पंजाबमधील लोक व्हॉट्सअ‍ॅपवर भ्रष्टाचारासंबंधीच्या तक्रारी पाठवू शकतील असे सांगितले आहे.

राज्यातील जनता आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करू शकणार आहे. इतकेच नाही तर हा नंबर खुद्द पंजाबचे मुख्यमंत्री भगवत मान यांचा पर्सनल व्हॉट्सअ‍ॅप नंबर असणार आहे, याबद्दलची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. हा हेल्पलाईन नंबर 23 मार्च रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे भगवंत मान यांनी सांगितले. ९९% लोक प्रामाणिक आहेत, १% लोक व्यवस्थेचा नाश करतात. मी नेहमीच प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे ते म्हणाले. आता पंजाबमध्ये हफ्ते वसुली थांबणार आहे. हफ्ते वसुलीसाठी कोणताही नेता कोणत्याही अधिकाऱ्याला त्रास देणार नाही.

मान यांनी ट्विट केले आहे की, "भगतसिंहजी यांच्या हुतात्मा दिनी अँटी करप्शन हेल्पलाईन नंबर जाहीर केला जाईल, तो नंबर माझा पर्सनल व्हॉट्सअ‍ॅप नंबर असेल. जर तुम्हाला कोणी लाच मागत असेल, तर त्याचा व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंग करुन मला पाठवा. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये आता भ्रष्टाचार चालणार नाही."

या घोषणेपूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कू या सोशल मिडिया अॅप्पवर एक पोस्ट केली होती ज्यामध्ये त्यांनी “पंजाबच्या हिताच्या दृष्टीने आज एक खूप मोठा निर्णय घेतला जाणार आहे. पंजाबच्या आजपर्यंतच्या इतिहासात कुणीही अशा प्रकारचा निर्णय घेतला नसेल. मी त्या निर्णयाची घोषणा लवकरच करेन”. दरम्यान नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या त्यामध्ये पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. पंजाब विधानसभेतील ११७ जागांपैकी तब्बल ९२ जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT