Bhagwant Mann SAKAL
देश

Punjab: सत्तेत येताच तडाखा! अँटी गँगस्टर टास्क फोर्सला थेट कारवाईचे निर्देश

भगवंत मान यांनी राज्यातील गुंडशाहीचा नायनाट करण्यासाठी अँटी गँगस्टर टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली होती.

सकाळ डिजिटल टीम

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना चौकशी करून गुंडशाहीविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले.

राज्याच्या सीपी आणि एसएसपींना यासंदर्भात उद्देशून लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणाले की,पंजाब पोलिसांना देश सेवेची परंपरा आहे. सोबतच मुख्यमंत्री पोलीस दलावर विश्वास व्यक्त करत म्हणाले, "राज्यातील 'गुंडशाही' नाहीशी करण्यासाठी पंजाब पोलिस एकत्रित मोहीम राबवतील आणि या प्रकरणी दल प्रमुख म्हणून हे अधिकारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार." (Punjab CM Bhagwant Mann asked the CP and Senior Superintendents of Police to play a frontal role against gangsters)

5 एप्रिल रोजी झालेल्या कायदा आणि सुव्यवस्था आढावा बैठकीचा संदर्भ देत भगवंत मान यांनी भ्रष्टाचार निर्मूलन आणि पोलीस दलाद्वारे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावर सरकार प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

5 एप्रिल रोजी भगवंत मान यांनी राज्यातील गुंडशाहीचा नायनाट करण्यासाठी अँटी गँगस्टर टास्क फोर्स (AGTF) ​​स्थापन करण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “एजीटीएफमुळे पोलिस आयुक्तालय आणि जिल्ह्यांचे प्रमुख सीपी आणि एसएसपी यांची जबाबदारी कमी होणार नाही कारण हे दोघेही त्यांच्या क्षेत्रात गुन्हेगारी संपवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारीपुर्वक भुमिका बजावणार.”

जानेवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत गंभीर चूक झाल्याचे आढळून आली होती. फिरोजपूर येथे पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन होणार होते. त्यासाठी पंतप्रधान पंजाबमध्ये दाखलही झाले होते. मात्र अचानक दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान माघारी परतले. पाऊस आणि खराब हवामान यामुळे पंतप्रधानांनी फिरोजपूर दौरा रद्द केला असे प्रथम सांगितले जात होते. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आलाय. त्यामुळे पंजाबच्या सुरक्षा व्यवस्थेवर ताशेर ओढण्यात आले होते. मात्र आता मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पुढाकाराने सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT