Petrol Diesel Price Hike: पंजाब सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये वाढ केली आहे. याचा अर्थ आता पंजाबमधील जनतेला एक लिटर पेट्रोलसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
त्याचबरोबर डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. आता राज्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 98.65 रुपये होणार आहे. तसेच डिझेलची किंमत 88.95 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.
गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसताना पंजाब सरकारने हा निर्णय घेतला आहे. एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. नवी दिल्लीसह सर्व महानगरांमध्ये त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
पंजाब सरकारने व्हॅट किती वाढवला आहे?
पेट्रोल व्हॅट दरात सुमारे 1.8 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 92 पैशांनी महागले आहे. डिझेल व्हॅट दर 1.13 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये प्रतिलिटर 90 पैशांची वाढ झाली आहे. वाढलेले दर मध्यरात्री 12 पासून लागू झाले आहेत.
या वाढीनंतर मोहालीमध्ये एक लिटर पेट्रोल 98.3 रुपयांऐवजी 98.95 रुपयांना मिळणार आहे. तर डिझेल 88.35 रुपयांऐवजी 89.25 रुपयांना मिळणार आहे.
मंत्रिमंडळात मंजूरी:
कॅबिनेट बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट लावण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप आम आदमी पक्षाच्या सरकारने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. एएनआयने आपल्या ट्विटमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याची माहिती दिली आहे.
चार प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर:
नवी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.