Chandigarh University Girls Protest esakal
देश

Chandigarh : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आलं 'सत्य'

एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना इतर 60 विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर व्हायरल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना इतर 60 विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर व्हायरल केला आहे.

Chandigarh University Girls Protest : पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातून (Chandigarh University) एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका विद्यार्थिनीनं (Girl) आंघोळ करताना इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसतिगृहातील (Girls Hostel) 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

प्रकरण दडपण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव

परिणामी, पंजाबच्या मोहालीतील (Punjab Mohali) चंदीगड विद्यापीठात रात्री उशिरा परिस्थिती अनियंत्रित झाली होती. चंदीगडच्या एका खासगी विद्यापीठात शनिवारी रात्री अडीच वाजता मोठा गोंधळ झाला. गर्ल्स वसतिगृहातील एका मुलीनं आंघोळ करताना इतर 60 मुलींचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवल्याचा आरोप आहे. मुलांनी तो व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल केला. रिपोर्ट्सनुसार, गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींचा बराच वेळ अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला जात होता. हे प्रकरण दडपण्यासाठी व्यवस्थापन त्यांच्यावर दबाव आणत असल्याचं विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, ही बाब समजल्यानंतर वसतिगृहात (Girls Hostel) राहणाऱ्या आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आरोपी विद्यार्थिनीला ताब्यात घेण्यात आलं असून तिची चौकशी करण्यात येत आहे. सध्या दोन मुलींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर या पोस्ट आणि ट्विट व्हायरल होत आहेत. यामध्ये विद्यार्थिनी व्हायरल व्हिडिओमुळं व्यथित होऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

विद्यार्थिनींचे व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल

अशाच एका विद्यार्थिनीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. यात तिनं लिहिलंय, चंदीगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ह्या प्रकरणी आवाज उठवू नये. याशिवाय, विद्यार्थिनींच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही (WhatsApp Chat) त्यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांना आत्महत्येची माहिती दिल्याचं उघड झालंय. आमचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवले आहेत, त्यासाठी त्यांनी खूप पैसेही घेतले आहेत, असा आरोप विद्यार्थिनींनी केलाय. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी इतर विद्यार्थिनींनाही या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपल्याला खूप लाज वाटू लागली असून त्यामुळं आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं विद्यार्थिनींचं म्हणणं आहे. प्रशासनानं याप्रकरणी कारवाई केली असून, लवकरच या विद्यार्थिनींचे व्हिडिओ इंटरनेटवरून हटवण्यात येणार असून त्यासाठी प्रयत्नही सुरू असल्याचं सांगितलं आहे.

महिला आयोग संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार

पंजाबच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी चंदीगड विद्यापीठात पोहोचणार असून त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. दुसरीकडं एक विशेष तपास पथकही शिमल्यात पाठवण्यात आलं आहे. विद्यार्थिनींनी संयम बाळगावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तक्रार करूनही कारवाई केल्यानं संतप्त विद्यार्थिनींनी विद्यापीठासमोर गोंधळ घातला आहे.

आरोपी विद्यार्थिनीला अटक

एसएसपी विवेक सोनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, हे व्हिडिओ एका विद्यार्थिनीनं शूट केलं होतं आणि नंतर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपी विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. अद्याप आत्महत्येच्या प्रयत्नाचे वृत्त आलेलं नाही. त्यामुळं कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT