पंजाबमध्ये विरोधकांची बत्ती गुल्ल करणाऱ्या आम आदमी पार्टीनं ((Aam Aadmi Party)) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केलीये. वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य राहिलेल्या हरभजन सिंगचाही (Indian Former Cricketer Harbhajan Singh) या यादीत समावेश आहे. पंजाबमधील 7 पैकी 5 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 9 एप्रिल 2022 रोजी संपुष्टात येत आहे. राज्यसभेच्या या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. आपकडून हरभजन सिंगनही अर्ज भरला आहे. त्यानंतर हरभजनची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
क्रीडा क्षेत्राचा विकास करणे हेच माझ्यासमोरील ध्येय आहे. पंजाबमधील युवा क्रीडा क्षेत्राशी जोडला जाईल, यासाठी प्रयत्न करेन. ऑलिम्पिकमध्ये 200 पदक मिळवण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यामुळे देशभरात क्रिडा क्षेत्राला चालना देण्यासाठी जे काही करता येईल ते करेन, अशा शब्दांत हरभजनने आपला मानस बोलून दाखवलाय.
पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 पैकी 92 जागा जिंकून विरोधकांच्या बत्या गुल्ल केल्या आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीतही त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे हरभजन सिंग खासदार होणार हे जवळपास निश्चित आहे.
पंजाबमधील प्रस्तावित स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे प्रमुखपदाची जबाबदारी ही हरभजन सिंगकडे दिली जाऊ शकते. हरभजन सिंग शिवाय राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) शिक्षणतज्ज्ञ संदीप पाठक, दिल्लीचे आमदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या नावाचाही समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.