QR Codes in School Textbooks  
देश

QR Codes in School Textbooks : शालेय पाठ्यपुस्तकात दिले जाणार ‘क्युआर कोड’; मेघालय सरकारचा निर्णय

QR Codes in School Textbooks : मेघालयाच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक आर. मन्नेर यांनी शालेय पाठ्यपुस्तकात क्युआर कोडचा समावेश करण्याच्या फायद्यांवर भर दिला.

सकाळ वृत्तसेवा

शिलाँग : मेघालयात शालेय पाठ्यपुस्तकात ‘क्युआर कोड’चा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे, २१ व्या शतकातील विद्यार्थ्यांना या तंत्रस्नेही उपक्रमामुळे स्मार्टफोनच्या मदतीने क्युआर कोड स्कॅन करून संबंधित प्रकरणाबद्दल अधिक माहिती घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांचे वेळ व्यवस्थापन कौशल्य वाढविण्यासह पूरक ज्ञानाचे पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांना सशक्त बनविणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे, असे राज्याचे शिक्षण सचिव ए. मारक यांनी सांगितले.

ते म्हणाले, की मेघालयमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांत आम्ही क्युआर कोडचा समावेश करत आहोत. ते स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयाबद्दलची अतिरिक्त माहिती मिळविता येईल. विद्यार्थ्यांमधील वेळेच्या व्यवस्थापनाचे कौशल्य वाढवून त्यांना आपल्या पसंतीनुसार अधिक ज्ञान मिळविता यावे, हा या उपक्रमामागील हेतू आहे. स्मार्टफोनवरून क्युआर कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांना धडे असलेला व्हिडिओ आणि सोडविलेल्या प्रश्नपत्रिका असलेल्या शैक्षणिक ॲपचा पर्याय खुला होईल. त्यामुळे, अभ्यास साहित्य शोधण्यावर जाणारा त्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना अध्ययनावर लक्ष्य केंद्रित करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

मेघालयाच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक आर. मन्नेर यांनी शालेय पाठ्यपुस्तकात क्युआर कोडचा समावेश करण्याच्या फायद्यांवर भर दिला. त्यामुळे, विद्यार्थ्यांना एखाद्या विशिष्ट विषयात स्व-अभ्यास करण्यात मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. राज्याचे शिक्षणमंत्री रक्काम ए. संगमा यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. मेघालयातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शैक्षणिक स्त्रोतांसाठी राज्य सरकारची कटिबद्धताही त्यांनी अधोरेखित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT