R N Ravi Governor of Tamil Nadu demands to be removed from post President Draupadi Murmu politics  sakal
देश

तमिळनाडूच्या राज्यपालांना हटवा; द्रमुक आणि घटक पक्षाचे राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र

राज्यपाल हे तमिळनाडूत धार्मिक द्वेष पसरवत असल्याचा आरेाप

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली/चेन्नई : तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक आणि त्यांच्या घटक पक्षांनी राज्यपाल आर.एन.रवी यांना पदावरून हटवावे अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. राज्यपाल हे तमिळनाडूत धार्मिक द्वेष पसरवत असल्याचा आरेाप द्रमुकच्या नेत्यांनी पत्रात केला आहे. या पत्रात राज्यपाल हे राज्यातील शांतताभंग करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले आहे.

द्रमुक आणि घटक पक्षांनी पत्रात म्हटले, की तमिळनाडूचे राज्यपाल विधानसभेत मंजूर झालेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यास अकारण विलंब करत आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. एकप्रकारे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला लोकांचे काम करण्यात अडथळे आणले जात आहेत. राज्यपाल राज्यात धार्मिक द्वेष पसरवत आहेत आणि ते राज्याच्या शांततेला बाधा आणत आहेत. राज्यपालासारख्या घटनात्मक पदावर राहण्यास पात्र नाहीत हे त्यांनी सिद्ध केले आहे.

त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरून बरखास्त करावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. काही जण त्यांच्या वक्तव्याकडे देशद्रोह म्हणून पाहत आहेत, कारण त्यांच्या वक्तव्याने शासन व्यवस्थेविरोधात वातावरण तयार होत असल्याचे द्रमुकचे म्हणणे आहे. द्रमुकने या महिन्याच्या प्रारंभी समान विचारसरणी असलेल्या सर्व खासदारांसाठी एक पत्र लिहले होते. या पत्रात घटनेच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप करत आर.एन.रवी यांना हटविण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. दरम्यान, तमिळनाडूत सुमारे २० विधेयक राज्यपालांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. नीट परीक्षेत सवलत देणारे विधेयक राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी न पाठविल्याने द्रमुक नेत्यांनी आरएन रवी यांच्या विरोधात आंदोलन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT