Rahul Gandhi Accepts Challenge Esakal
देश

Rahul Gandhi Accepts Challenge: आव्हान स्वीकारलं! PM मोदींसोबत जाहीर चर्चेसाठी राहुल गांधी तयार, म्हणाले, 'पण ते...'

अंकिता खाणे (Ankita Khane)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर वाद-विवाद करण्यासाठीचं निमंत्रण स्वीकारलं आहे. मी पंतप्रधानांसोबत समोरासमोर चर्चा करण्यास तयार असल्याचे राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी. लोकुर, अजित शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांच्या पत्राला उत्तर देताना सांगितलं आहे. राहुल गांधी यांनी यासंबधीची पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मिडीया ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांनीही जनतेच्या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी, असं मला सांगितलं. राजकीय पक्ष निवडणूक लढतात. नेत्यांना थेट ऐकण्याचा जनतेचा हक्क आहे. जर पंतप्रधान तयार झाले तर मी स्वत: किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या चर्चेत सहभागी होतील.

न्यायमूर्ती लोकूर, शाह आणि पत्रकार एन राम यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी दिलेले निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. यासोबत राहुल म्हणाले की, मी पंतप्रधानांना ओळखतो. ते माझ्याशी चर्चा करणार नाही. लखनऊ येथे शुक्रवारी झालेल्या संविधान परिषदेत राहुल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला मी 100 टक्के तयार आहे. जर त्यांना माझ्याशी चर्चा करायची नसेल तर आमचे अध्यक्ष खरगेजी आहेत, ते त्यांच्याशीही चर्चा करू शकतात.

संविधान हातात घेऊन परिषदेला पोहोचलेल्या राहुल गांधींनी मोदी सरकारला आरक्षणविरोधी म्हणत टीका केली आणि पुढे म्हणाले की, देशात मागासलेले लोक, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांची संख्या ९० टक्के आहे, मात्र त्यांच्यासाठी रस्ते बंद केले जात आहेत. सर्वत्र त्यांना संविधानात दिलेला आरक्षणाचा लाभ रद्द केला जात आहे. संस्थांचे खाजगीकरण हाच एकमेव मार्ग आहे. जेव्हा सरकारी संस्था राहणार नाहीत, तेव्हा आरक्षण देण्याची गरजच उरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT