संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभाग्रहात घुसखोरी केल्या प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकराने एकच खळबळ उडाली होती, दरम्यान संसदेतील सुरक्षाव्यवस्था भंग झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राहुल गांधींनी संसदेत झालेल्या घुसखोरीचं कारण देखील सांगितलं आङे,
संसदेच्या सुरक्षेचा भंग झाला हे खरं आहे, पण ते का झालं? देशात सध्या बेरोजगारीचा मुद्दा सर्वात मोठा आहे, तो संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. मोदींच्या धोरणांमुळे देशातील तरुणांना काम मिळत नाहीये. संसदेच्या सुरक्षेचा भंग झाला, पण त्याच्या मागे कारण हे बेरोजगारी आणि महागाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
संसदेत घुसखोरीच्या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेमागे ललित झा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात असून सरकारकडून त्यांच्या मागण्या पूर्ण करवून घ्यायच्या होत्या, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केलेल्या रिमांड याचिकेत केली आहे.
त्याचबरोबर त्यांना देशात अराजकता माजवायची होती. या घटनेमागील आरोपींचा खरा हेतू आणि त्यांचे शत्रू देश, दहशतवादी संघटनांशी काही संबंध आहेत का या अँगलचाही तपास सध्या पोलिस करत आहेत. तसेच या नियोजित हल्ल्यामागील मोठा कट उलगडण्यासाठी सखोल आणि सविस्तर चौकशी ची गरज असल्याचे देखील म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.