Rahul Gandhi on Dog Biscuits Viral Video Esakal
देश

Rahul Gandhi: भाजपने शेअर केलेल्या 'त्या' Video मागचं सत्य काय? राहुल गांधींनी दिलं उत्तर, म्हणाले, 'कुत्र्यांनी भाजपचं...'

Rahul Gandhi on Dog Biscuits Viral Video: भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींचा कुत्र्याला बिस्किट खाऊ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. त्यावर आज राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींचा कुत्र्याला बिस्किट खाऊ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी एका श्वानाला बिस्किट खायला घालतात. श्वानाने बिस्किट नाकारल्यानंतर ते बिस्किट तिथे उभे असलेल्या कार्यकर्त्याच्या हातात देतात असा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यावरून वाद वाढल्यानंतर राहुल गांधींनी या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी कारच्या छतावर बसून कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुत्रा बिस्कीट खात नाही तेव्हा ते शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला देतात, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओवरून भाजपने राहुल गांधींवर हल्लाबोल केला. याबाबत राहुल यांना विचारले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'यात काय मुद्दा आहे? जेव्हा त्या कुत्र्याला माझ्याकडे आणलं, तेव्हा तो घाबरला होता. तो थरथरत कापत होता. त्याने काही खाल्लं नव्हतं म्हणून मी त्याला बिस्किट खायला दिलं, पण, त्याने ते बिस्किट खाल्लं नाही. म्हणून त्या व्यक्तीला दिले आणि सांगितलं, भाऊ, तुम्हीच त्याला खायला द्या. नंतर कुत्र्याने ते बिस्किट खाल्लं. यावर भाजप नेत्यांना काय अडचण आहे? कुत्र्याने त्यांचे काय नुकसान केले आहे?'.

या व्हायरल व्हिडिओवरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "केवळ राहुल गांधीच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मला हे बिस्कीट खायला देण्याचा प्रयत्न केला, पण मी खाल्लं नाही."

पल्लवी नावाच्या एका महिलेने हिमंता बिस्वा सरमा यांना टॅग करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता आणि लिहिलं होतं की, हिमंता यांच्यानंतर आता राहुल गांधींनी कुत्र्याने नाकारलेले बिस्किट एका कार्यकर्त्याला दिली आहेत. यावर उत्तर देताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे की, "पल्लवी जी, फक्त राहुल गांधीच नाही तर संपूर्ण कुटुंब मला ते बिस्कीट खाऊ घालू शकले नाही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी बिस्कीट खाण्यास नकार दिला आणि राजीनामा दिला".

अमित मालवीय यांनी व्हिडिओ शेअर साधला काँग्रेसवर निशाणा

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही या घटनेवरून राहुल गांधींवर निशाणा साधला होता. त्यांनी राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

मालवीय यांनी लिहिले की, "काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यांशी केली होती आणि आता राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत आहेत आणि जेव्हा कुत्रा खात नाही, तेव्हा त्यांनी तीच बिस्किटे कार्यकर्त्याला दिली."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT