नवी दिल्ली : देशात आणखी कोरोना रुग्णांची (coronavirus) संख्या वाढत आहे. त्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (rahul gandhi on corona cases) यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या केंद्रसरकार हे मालमत्ता विकण्यात व्यस्त आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन करत त्यांनी केंद्र सरकारवर टीका देखील केली आहे.
देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय आहे. येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेचे गंभीर परिणाण टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. कृपया सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, कारण केंद्र सरकार तर फक्त मालमत्ता विकण्यात व्यस्त आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
दरम्यान, आज देशात ४६ हजार १६४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ६०७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही ३,२५,५८,५३० वर पोहोचली आहे, तसेच मृत्यूंची संख्या ४,३६,३६५ वर पोहोचली आहे. सध्या देशात ३,३३,७२५ सक्रीय रुग्ण आहेत.
केंद्राने नुकतीच एक नॅशनल मॉनिटायझेश प्लॅन (NMP) जाहीर केला ज्यामध्ये खाजगी क्षेत्राशी संलग्न होऊन 6 कोटी रुपयांची मालमत्ता भाडेतत्वावर देऊन कमाई केली जाईल. त्यावरूनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये केलेली देशातील कमाई भाजप सरकार विकत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, ही मालमत्ता विकत नसून फक्त भाडेतत्वावर देणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यामधून मिळालेल्या पैशाने देशाचा विकास केला जाईल, असेही केंद्र सरकारने सांगितले आहे.
दरम्यान, मॉनिटायझेशन म्हणजे नेमके काय हे राहुल गांधी यांना कळत नाहीये, आम्ही कोणतीही संपत्ती विकत नाही. त्याचा ताबा पुन्हा सरकारकडेच येईल. भाजप सरकारने देश विकला असा आरोप करणाऱ्या काँग्रेसनेच हवा, पाणी, जमीन, खाणी विकल्या व त्याबदल्यात त्यांना पुरेपूर मोबदलाही मिळाला. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धांच्यावेळीही असेच लोणी खाल्ले गेले, हीच यांची कुकर्मे आहेत. मात्र मोदी सरकारवर 2014 पासून लाचखोरीचा एकही आरोप झाला नाही, असे स्पष्टीकरण निर्मला सीतारामन यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.