Rahul gandhi on Hinduism file Photo
देश

हिंदू 'सत्याग्रहा'वर, तर हिंदूत्ववादी 'सत्ताग्रहा'वर विश्वास ठेवतात - राहुल गांधी

सकाळ डिजिटल टीम

लखनौ: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज उत्तर प्रदेशातील अमेठी (Rahul Gandhi Amethi Meeting) येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हिंदूत्वावरून (Rahul Gandhi on Hinduism) पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला. हिंदूत्ववाद्यांमुळे आपल्या देशात दुःख, वेदना आणि महागाई आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

अमेठी हा राहुल गांधींचा पूर्वीचा बालेकिल्ला आहे. पण, या मतदारसंघात स्मृती इराणी यांनी ताबा मिळवला आहे. आता परत काँग्रेसला त्यांचा बालेकिल्ला ताब्यात घ्यायचा आहे. त्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने लढत असल्याचे दिसतेय. प्रियांका गांधी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने सभा घेत आहेत. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवरून पराभूत झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षातील राहुल गांधी यांचा अमेठीचा हा पहिला दौरा आहे. त्यांची आज अमेठी येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला.

हिंदूत्वावरून हल्लाबोल -

''आजची लढाई हिंदू आणि हिंदूत्ववाद्यांमध्ये आहे. हिंदू 'सत्याग्रहा'वर विश्वास ठेवतात, तर हिंदुत्ववादी फक्त 'सत्ताग्रह' (राजकीय लाभ)वर विश्वास ठेवतात. पंतप्रधान गंगा नदीत डुबकी घेत असताना ते बेरोजगारीसारख्या मुद्द्यावर मौन बाळगतात. आज देशात लोकांना रोजगार का मिळत नाही? महागाई इतक्या झपाट्याने का वाढत आहे?" असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला.

मूळ मुद्द्यावरून लक्ष वळवण्यासाठी खेळ -

''आज लडाखमध्ये चीनने भारताची जमीन हिसकावून स्वतःच्या ताब्यात घेतली. पण पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. पंतप्रधान जमीन घेतली नाही असं सांगतात. त्यानंतर थोड्याचवेळात संरक्षण मंत्रालयाकडून जमीन बळकावली असं सांगितलं जातं. या सरकारमध्ये काय सुरू आहे? महत्वाच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी हे सर्व केलं जातं'', असा घणाघात राहुल गांधींनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT