Rahul Gandhi statement Talked about Savarkar with evidence maharashtra akola  sakal
देश

Rahul Gandhi : सावरकरांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी अडचणीत! बदनामीची फौजदारी तक्रार दाखल

सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : स्वा. सावरकरांवर केलेली टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भोवली आहे. त्यांच्याविरोधात सावरकरांचे नातून सत्यकी सावरकर यांनी बदनामीचा फौजदारी तक्रार दाखल केला आहे. त्यामुळं राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. इंग्लंडमध्ये केलेल्या विधानाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सावरकरांच्या एका भावाचा नातू असलेल्या सत्यकी सावरकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "राहुल गांधी गेल्या महिन्यात इंग्लंडला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी एका भेटीदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ देताना चुकीची माहिती दिली आहे. सावरकरांनी आपल्या ५ ते ६ मित्रांच्यामदतीनं एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा आनंद लुटला होता," असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.

पण राहुल गांधींनी सांगितलेला हा संदर्भ खोटा असून केवळ काल्पनिक आहे. त्यामुळं राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांकडून आम्ही अनेकदा सावरकरांविरोधातील तथाकथीत माफीनामा आणि पेन्शनबाबत ऐकलं आहे. पण प्रत्यक्षात त्या क्षमा याचिका आणि निर्वाह भत्ता होता. त्यामुळं राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील या विधानांविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, अशी माहिती सत्यकी सावरकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT