काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. नॅशनल हेराल्ड गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिग या प्रकरणात या दोघांची चौकशी होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत, ते ५ जूनला परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी ईडीकडे मुदत वाढवून मागवली आहे. (Rahul Gandhi will ask for extended date of ED Enquiry)
काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं की राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) १९ मे पासून लंडनमध्ये विविध कार्यक्रमांसाठी गेलेले आहेत. तेव्हापासून ते परत आलेले नाहीत. राहुल गांधी ५ जूनपर्यंत भारतात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनी लाँडरिंग प्रकरणात (National Herald Money Laundering Case) ईडीच्या चौकशीसाठी ते पुढची तारीख मागण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांना ८ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास ईडीने सांगितलं असून राहुल गांधींना चौकशीसाठी २ जून ही तारीख देण्यात आली आहे. मात्र राहुल गांधींनी ५ जूननंतरची तारीख मागितली असल्याची माहिती पक्षाच्या काही सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, काँग्रेसने या कारवाईचा निषेधही केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत काँग्रेसने म्हटलं आहे की, काँग्रेस ब्रिटीश आणि त्यांच्या अॅट्रोसिटीला जर घाबरत नसेल तर ईडीची नोटीस सोनिया आणि राहुल गांधी, काँग्रेसची हिंमत कशी काय तोडू शकेल? आम्ही लढू, आम्ही जिंकू आणि आम्ही झुकणार नाही, आम्ही घाबरणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.