Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi: "राहुल गांधींना कामधंदा नाही म्हणजे भारतीय तरुण बेरोजगार आहेत असं नाही"

राहुल गांधी हे सातत्यानं देशातील बेरोजगारीवर प्रश्न विचारत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

चेन्नई : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्यानं देशातील बेरोजगारीवर प्रश्न विचारत आहेत. रोजगारावरुन त्यांचं भाजप सरकारवर सातत्यानं टार्गेट करणं भाजपच्या नेत्यांना रुचत नाहीए. त्यामुळेच तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष अण्णामलाई यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे. (Rahul Gandhi is unemployed does not mean Indian youth are unemployed says BJP TN Chief Annamalai)

अण्णामलाई म्हणाले, "फक्त काँग्रेस नेते राहुल गांधींना काही कामधंदा नाही याचा अर्थ असा नाही की संपूर्ण भारतातील तरुण बेरोजगार आहेत. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिणेकडील राज्ये भाजपसाठी मोठा विजय मिळवून देतील.

विशेषतः तामिळनाडू आणि तेलंगाणामध्ये तसेच कर्नाटक आणि केरळमध्येही हा बदल दिसून येईल. विकास आणि मोदींचा करिष्मा या दोन गोष्टी २०२४ मध्ये भाजपच्या विजयात महत्वाच्या भूमिका बजावतील" (Latest Marathi News)

इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमधील 'टार्गेट २०२४' या विषयावर त्यांना दक्षिण भारत कोण जिंकेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये बोलताना अण्णामलाई म्हणाले, माणिकम टागोर जे काँग्रेसचे खासदार आहेत ते आपल्या मुख्य नेत्यांना बोलताना हायकमांड असा शब्द प्रयोग करतात.

पण आम्ही अभिमानानं स्वतःला मोदींजींचा कार्यकर्ता असं संबोधतो. काँग्रेसच्या संस्कृतीमुळं तामिनाडूमध्ये राष्ट्रीय पक्षांना वाईट नावानं संबोधलं जातं. कारण फक्त राहुल गाधींमुळं कारण त्यांनाच केवळ कामधंदा नाही त्यामुळं देशाचा प्रत्येक तरुण बेरोजगार आहे असं नाही.

कर्नाटकच्या निवडणुकीबाबत बोलताना अण्णामलाई म्हणाले, कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपनं स्वच्छपणे निवडणूक लढवली. आम्ही आमचं व्होटशेअर राखलं. पाँडिचेरीमध्ये आम्ही ठराविक जागा जिंकलो आणि युतीचं सरकार स्थापन केलं. आता २०२४ मध्ये भाजपसाठी मोठं यश मिळेल विशेषतः तामिळनाडू आणि तेलंगाणामध्ये कर्नाटक आणि केरळच्या मदतीनं हे शक्य होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT