Rahul Gandhi LK Sharma Smriti irani Congress BJP Esakal
देश

Rahul Gandhi: अमेठीतून पीएला निवडणूक लढायला लावली? राहुल गांधी 'त्या' प्रश्नावर भाजपवर भडकले

INDIA vs NDA: जर सर्व आकडे जुळून आले आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडीने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले तर ही काँग्रेस पक्षासाठी संजीवनी ठरेल.

आशुतोष मसगौंडे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळपास पूर्ण होत आला असून, यामध्ये भाजप बहुमताच्या जवळ पोहचली असली तरी अजूनपर्यंत कोणालाही पूर्णपणे बहुमत मिळाले नाही. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार एनडीए सुमारे 290 जगांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीही 235 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे.

हा असा अनपेक्षित निकाल येत असल्याने भाजपला पछाडत इंडिया आघाडी सत्ता स्थापन करणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान नुकतीच काँग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी उपस्थिती होते.

अमेठीमधून काँग्रेसन विजय मिळवला आहे. येथे एल के शर्मा विजयी झाले आहे. प्रचाराच्या वेळी अमेठीतून तुमच्या पीएला निवडणूक लढायला लावली असा आरोप भाजपने केला होता? यावर राहुल म्हणाले, भाजपला लोकांचा आदर करता येत नाही, लोकांशी नीट बोलता येत नाही. हे पाहा, एल के शर्मा गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आहेत. आणि त्यांचे अमेठीच्या लोकांशी नाते आहे. आणि हेच भाजपला समजले नाही.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अत्यंत खराब कामगिरी करत होता. मात्र, यंदा सर्व अपयश मागे टाकत ते जवळपास 100 जागांवर विजयी होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

जर सर्व आकडे जुळून आले आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडीने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले तर ही काँग्रेस पक्षासाठी संजीवनी ठरेल.

दरम्यान दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांना यंदा अनेक जागा गमवाव्या लागल्या आहेत.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या यशात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. पण यंदा समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपला निम्म्या जागांवर आणले आहे. आणि इंडिया आघाडीला यश मिळण्याचे हेच मोठे कारण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT