भारत जोडो यात्रेनिमीत्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी एक खास मुलाखत दिली. ही मुलाखत काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.यामध्ये राहुल गांधींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान-मोठी पैलूंवर भाष्य केलं आहे. यादरम्यान त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आणि सवयीही शेअर केल्या.
राहुल गांधींना विचारण्यात आलं खी तुम्हाला काय खायला आवडते? यावर त्यांनी उत्तर दिलं की, मी सर्व काही खातो. जे मिळेल ते खातो. मात्र, मला फणस आणि वाटाणे आवडत नाहीत. जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी काय खातो आणि काय पितो याबद्दल मी खूप काळजी घेतो.
इथे यात्रे दरम्यान तसं काही नाही. उत्तर प्रदेशात स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडिताच्या घरात माझा जन्म झाला, असे ते म्हणाले. पप्पांचे वडील पारशी होते. त्यामुळे घरचे अन्नही सामान्य असायचे असेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी लग्न कधी करणार?
या सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी योग्य मुलगी सापडली की लग्न करू, असे उत्तर दिलं. ते म्हणाले की, अट एकच आहे की मुलगी हुशार असावी, असे राहुल गांधी म्हणाले.
दिल्लीतील खाण्यापिण्यासाठी आवडती ठिकाणं?
राहुल गांधी म्हणाले की, पूर्वी ते जुन्या दिल्लीला जायचो. आता मोती महालमध्ये जाो . मी कधी सागर, स्वागत तर कधी सरवाना भवनात जातो. भारत जोडो यात्रेत मी संस्कृती जवळून पाहिली आहे.
तेलंगणासारख्या काही राज्यांमध्ये मसालेदार अन्नाचा वापर खूप जास्त आहे. संस्कृती केवळ राज्यांमध्येच नाही तर राज्यांमध्येही बदलते. राहुल गांधी म्हणाले की, त्यांना जेवणात तंदुरी खायला आवडते. म्हणूनच चिकन टिक्का, सीख कबाब आणि चांगले ऑम्लेट त्यांना आवडतात.
राग आल्यावर राहुल गांधी काय करतात?
राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा त्यांना खूप राग येतो, तेव्हा ते पूर्णपणे गप्प होतात किंवा असे करू नका असे सांगतात. भारत जोडो यात्रा ही एक तपश्चर्या आहे. भारतीय संस्कृतीत तपश्चर्याचे खूप महत्त्व आहे. म्हणूनच कोणतेही काम करताना येणाऱ्या अडचणी ही एक प्रकारची तपश्चर्या आहे.
बेडजवळच्या कपाटात काय ठेवता?
राहुल गांधी यांनी सांगितले की, ते बेडच्या बाजूच्या कपाटात पासपोर्ट, आयडी, रुद्राक्ष, भगवान शिव आणि बुद्ध यांचे चित्र, पर्स आणि फोन ठेवतात.
पहिला पगार किती मिळाला होता
राहुल गांधी यांनी सांगितले की, त्यांनी पहिले काम लंडनमध्ये केले. त्यावेळी त्याला मिळणारा पगार त्या वेळेनुसार बऱ्यापैकी होता. कंपनीचे नाव 'मॉनिटर' होते, जी एक स्टॅटेजिक कंसल्टिंग कंपनी होती. पहिल्यांदा मला चेकने पगार मिळाला.
त्यांनी सांगितले की, त्यावेळी ते भाड्याच्या घरात राहत होते, त्यामुळे सर्व काही त्यातच खर्च होते असे. राहुलने सांगितले की, त्यांना सुमारे अडीच हजार पौंड पगार मिळाला होता, जो त्यावेळच्या मानाने खूप होता.
देशाचे पंतप्रधान झालात तर काय करायला आवडेल?
राहुल म्हणाले की, मला शिक्षण व्यवस्था सुधारायची आहे. मी लहान व्यवसायात करणाऱ्या लोकांना मदत करू इच्छितो. या लोकांना यावेळी मोठ्या उद्योगात घेऊन जाण्याची गरज आहे. याशिवाय ते म्हणाले की, शेतकरी, मजूर आणि बेरोजगार युवक सध्या अत्यंत वाईट काळातून जात आहेत, त्यांना मी सुरक्षा देऊ इच्छितो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.