नवी दिल्ली - संसदीय संरक्षण समितीच्या बैठकीतून काँग्रेस नेते राहुल गांधी निघून गेल्याचा प्रकार बुधवारी घडला. दुपारी तीनच्या सुमारास बोलावलेल्या संरक्षण समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) आणि डोकलामच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. परंतु समितीच्या अध्यक्षांनी परवानगी नाकारली. त्यानंतर राहुल गांधी हे बैठकीतून निघून गेले.
समितीच्या बैठकीत राहुल गांधी हे भारत-चीन सीमेबाबत चर्चा करण्याची मागणी करत होते. भाजपचे खासदार ज्युएल ओराम यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी देखील राहुल गांधी यांच्या मागणीला पाठिंबा दिला. या बैठकीत लष्करी छावणी मंडळाच्या कामकाजावर चर्चा केली जात होती. परंतु राहुल गांधी म्हणाले, की यापूर्वीच्या बैठकीपासून याच मुद्द्यावर चर्चा होत आहे. परंतु चीनच्या सीमेवर जे काही घडत आहे आणि अफगाणिस्तान येथे जे काही होत आहे, यासारख्या मोठ्या मुद्द्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र अध्यक्ष ओराम यांनी राहुल गांधी यांची मागणी फेटाळून लावली आणि अजेंड्यावरच्या विषयावरच चर्चा होईल, असे सांगितले.
राहुल गांधींनी एलएसी, चीन, तालिबान मुद्दे उपस्थित केल्याचं संसदीय समितीचे अध्यक्ष जुएल ओराम यांनी म्हटलं. मात्र राहुल गांधींनी वॉकआऊट केलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. चर्चेनंतर बैठकीतून बाहेर पडण्यासाठी राहुल गांधींनी परवानगी घेतल होती. त्यांनी सीमेवरील मुद्दे उपस्थित केल्याचं ओराम यांनी सांगितलं.
तत्पूर्वी राहुल गांधी पूर्व लडाख भागातील सैनिकी हालचालीच्या एका वृत्ताचा संदर्भ दिला. चिनी सैनिकांनी पूर्व लडाख भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली असून दोन्ही सैनिकांत किमान एक संघर्ष झाल्याचे त्या वृत्तात म्हटले होते. मात्र लष्कराकडून हे वृत्त फेटाळण्यात आले.
लष्कराने बातमी फेटाळली
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप आणि संबंधित वृत्त लष्कराने फेटाळून लावले. लष्कराने निवेदनात म्हटले की, फेब्रुवारीत ज्या ठिकाणांवरून दोन्ही पक्षाने माघार घेतली आणि ज्या ठिकाणांसंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे, त्या ठिकाणांवर भारतीय किंवा चीनच्या बाजूने कोणत्याही प्रकारे ताबा मिळवण्याचा प्रयत्न झालेला नाही.
मोदी सरकारने परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करुन देशाला कमकुवत केले आहे. भारत यापूर्वीही एवढा असुरक्षित कधीही नव्हता असं राहुल गांधी म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.