Rahul Gandhi MSP Guarantee Latest News : दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान छत्तीसगढच्या अंबिकापूर येथे एका रॅलीला संबोधित करताना राहुल गाँधी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पिकांना किमान आधारभूत किंमत (MSP) देण्याची गॅरंटी देतो असे राहुल गांधी म्हणाले आहेत. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील सर्वात मोठी मागणी ही MSP संबंधीतच आहे.
भारत जोडो न्याय यात्रेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील शतकऱ्यांना जे काही मिळालं पाहिजे ते त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत, मात्र त्यांना रोखलं जात आहे. त्यांच्यावर अश्रूधूराचा कांड्या टाकले जात आहेत. शेतकरी फक्त त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे इतकीच मागणी करत आहेत.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, शेतकरी बांधवांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. काँग्रेसने फ्रत्येक शेतकऱ्यांच्या पिकांना स्वामिनाथन आयोगानुसार एमएसपी कायदेशीर गॅरंटी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने १५ कोटी शेतकरी कुटुंबांचे आयुष्य बदलेल. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली गॅरंटी आहे.
आधारभूत किंमतीसाठी कायदा बनवला जावा या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चचाने दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी (१२ फेब्रुवारी) केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकरी नेत्यांच्या बैठकीतून कुठलाही तोडका निघाला नाही. त्यामुळे शेतकरी दिल्लीत आंदोलन करण्यासाठी दिल्लीकडे निघाले आहेत. यानंतर पोलीसांनी दिल्ली शहराच्या सीमांवर सुरक्षा बॅरिकेडींग केलं असून काँक्रिट ब्लॉक, खिळे आणि कंटेनरच्या भींती उभारून रस्ते आडवण्यात आले आहेत। शेतकऱ्यांना सीमेवर रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.