rahul gandhi  Sakal
देश

Rahul Gandhi on Agniveer : जवान शहीद झाल्यानंतर हा भेदभाव का? नाशिकमध्ये दोन अग्निवीरांच्या मृत्यूनंतर राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

रोहित कणसे

नाशिकमधील देवळाली आर्टिलरी सेंटरच्या फायरिंग रेंज भागात तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्‍चित स्थळी न जाता जागेवरच फुटल्याने झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू, तर एक जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान या घटनेवर आता काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे.

नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये झालेल्या या दुर्घटनेत गोहिल विश्‍वराज सिंग (वय २०, मूळ रा. गुजरात, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड), शक्कीन शीत (२१, मूळ रा. पश्‍चिम बंगाल, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अप्पाला स्वामी (२०) हा जखमी झाला होता. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये या दोन अग्निविरांचा मृत्यू वेदनादायक घटना असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी या दोघांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

नाशिकमध्ये ट्रेनिंगदरम्यान दोन अग्निविर - गोहिल विश्‍वराज सिंग आणि सैउक शीत यांचे निधन एक दुखद घटना आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.

ही घटना पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. ज्यांचे उत्तर देण्यास भाजप सरकार अयशस्वी ठरले आहे.

गोहिल आणि सैफत यांच्या कुटुंबियांना वेळेवर भरपाई मिळेल का, जी इतर कोणत्याही जवानांच्या हौतात्म्याच्या बरोबरीची असेल?

अग्निवीरांच्या कुटुंबियांना पेन्शन आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही? जर दोन्ही सैनिकांच्या जबाबदाऱ्या आणि बलिदान सारखेच आहे, तर मग त्यांच्या हौतात्म्याबद्दल हा भेदभाव का?

-अग्निपथ योजना लष्करासोबत अन्याय आहे आणि आपल्या वीर जवानांच्या हौतात्म्याचा अवमान आहे. पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे की एका सैनिकाचे जीवन दुसऱ्या सैनिकापेक्षा अधिक मुल्यवान का आहे?

"चला सोबत येऊन या अन्यायाविरोधात लढूया. भाजप सरकारने अग्निवीर योजना मागे घ्यावी, देशातील तरुण आणि लष्कराचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जय जवान आंदोलनात आजपासून सहभागी व्हा" असे अवाहन देखील राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबबातची 'ती' पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकरच्या भावाला पुण्यातून अटक

Women's T20 World Cup: टीम इंडिया अन् Semi Final च्या मार्गात तगडे लक्ष्य! ऑस्ट्रेलियाने उभं केलं विक्रमी आव्हान

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Doctor Protest: 14 ऑक्टोबरपासून डॉक्टरांचा देशव्यापी बंद, एफएआयएमएच्या बैठकीनंतर निर्णय, कारण काय?

IND W vs AUS W: रेणुका ऑन फायर! एकाच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला दिला दुहेरी धक्का, राधाचाही भन्नाट कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT