Rahul Gandhi Rahul Gandhi
देश

भारत लवकरच ‘द्वेष, संताप’मध्ये टॉपवर पोहोचेल; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत लवकरच ‘द्वेष आणि संताप’मध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचण्याची शक्यता आहे, असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी (ता. १९) सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट’चा (World Happiness Report ) हवाला दिला. ज्यामध्ये भारत १३६ व्या क्रमांकावर आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट केले की, भूकेच्या यादीत १०१ वा, स्वातंत्र्य यादीत ११९ वा आणि आनंदाच्या यादीत भारत १३६ व्या क्रमांकावर आहे. परंतु, आपण लवकरच द्वेष आणि संतापाच्या चार्टच्या शीर्षस्थानी (Targeting the government) असू शकतो.

तत्पूर्वी, त्यांनी महागाईच्या संदर्भात ट्विट करून म्हटले होते की, महागाई वाढेल, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल शंभर डॉलरपेक्षा जास्त असल्याने, खाद्यपदार्थांमध्ये २२ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. कोरोनाने जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत केली आहे. भारत सरकारने आताच कारवाई करून जनतेला महागाईपासून वाचवावे, असेही राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कच्च्या तेलाच्या आणि खाद्येतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये ६.०७ टक्क्यांच्या आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. या काळात घाऊक किमतीवर आधारित महागाई १३.११ टक्क्यांवर पोहोचली आहे. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीचा घाऊक किंमत निर्देशांकावर विपरीत परिणाम झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT