rahul priyanka gandhi 
देश

Rahul vs Priyanka: राहुल विरुद्ध प्रियांका: भाजपच्या व्हिडिओने खळबळ! गांधी कुटुंबात ठिणगी

कार्तिक पुजारी

Rahul gandhi vs Priyanka gandhi

नवी दिल्ली- भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचं दिलतंय. भाजपकडून राहुल गांधींविरोधात मोर्चा उघडण्यात आला असून एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या भाऊ-बहिणीमधील संबंधाविषयी व्हिडिओमध्ये भाष्य करण्यात आलं आहे. दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नाही असं भाजपला सुचवायचंय.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यामध्ये सर्व काही सुरळीत सुरु नाही. दोन्ही नेते समाजासमोर जे दाखवतात, त्यापेक्षा त्यांचे संबंध वेगळे आहेत, असं भाजपने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. एका सभेमध्ये प्रियांका गांधी राहुल गांधी यांचा हात पकडण्याचे नाकारतात असं व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय. राहुल गांधी प्रियांका गांधींना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपने केलाय.

प्रियांका गांधी राहुल यांच्यापेक्षा हुशार

राहुल गांधी राजकारणात येण्याआधी प्रियांका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. त्या काँग्रेस नेत्यांचा प्रचार करत होत्या. त्यांच्याकडे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खऱ्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात होतं. पण, राहुल गांधी आले आणि त्यांनी सर्व ताब्यात घेतलं. सोनिया गांधी यांनीही राहुल गांधी यांनाच पाठिंबा दिला.त्यामुळे प्रियांका गांधी नाराज असून केवळ परिवाराच्या प्रतिष्ठेसाठी ते एकत्र असल्याचं दाखवत आहेत, असा दावा भाजपने केला आहे.

काँग्रेसचा राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात लढताना ३९ निवडणुकांमध्ये पराभव झालाय, पण कुटुंबाकडून त्यांनाच पुढे केले जात आहे.प्रियांका गांधी यांच्यात जास्त कर्तृत्व आहे, याची जाणीव राहुल यांना आहे. प्रियांका यांनाच लोकांची पसंती आहे हे राहुल यांना माहिती आहे. त्यामुळेच ते प्रियांका गांधी यांना बाजुला करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच इंडिया आघाडीच्या झालेल्या तिन्ही बैठकीत त्यांना स्थान देण्यात आले नव्हते, असा आरोप व्हिडिओतून करण्यात आला आहे.

भाजपकडून राहुल गांधी लक्ष्य

भाजपने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दावा केलाय की, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यामधील संबंध सर्वसामान्य भाऊ-बहिणीसारखे नाहीत. प्रियांका गांधी या जास्त हुशार आहेत. पण, राहुल यांनाच पुढे केले जात असून प्रियांका यांचा वापर केवळ राजकारणासाठी केला जात आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मांडविया यांनी मागे असाही आरोप केला होता की, राहुल गांधी यांनी हिंदु परंपरेनुसार हातात राखी बांधली नाही. यावर लगेच काँग्रेसकडून उत्तर देण्यात आलं होतं. काँग्रेसने व्हिडिओ शेअर करत राहुल यांचा राखी बांधलेला हात दाखवला होता.

तीन दिवसांपूर्वी भाजपने एक पोस्टर शेअर केला होता. यात 'द क्राऊन' या नेटफ्लिक्स सिरिजचा संदर्भ देण्यात आला होता. सोनिया गांधी यांना क्विन म्हणून सिंहासनावर बसवलेलं दाखवण्यात आलं होतं. प्रियांका आणि राहुल यांच्यामध्ये 'क्राऊन' साठी संघर्ष असल्याचं कॅप्शन देण्यात आलं होतं.

काँग्रेसचे उत्तर

प्रियांका गांधींनी भाजपच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत हे हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी भाजपचा दावा फेटाळून लावला आहे. भाजपने राजकारणाची पातळी आणखी खाली नेली आहे, अशी टीका काँग्रेसने केलीये. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई होणार आहे. त्यात भाजपने राहुल यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं बोललं जातं.

भाजपकडून थेट खासगी टीका करण्यात आली आहे. मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवण्यासाठी हा भाजपचा नवा डाव आहे. देशातील बेरोजगारी, अदानींचा घोटाळा, मणिपूर प्रश्नावर न बोलता लोकांचे लक्ष विचलित करण्याची भाजपची खेळी आहे. तुमचे खरे रुप समोर आले आहे. काँग्रेस खऱ्या मुद्द्यापासून भटकणार नाही, काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनाते यांनी असं म्हटलं.(Latest Marathi News)

भाजपमध्ये अस्वस्थता

इंडिया आघाडीच्या निर्मितीमुळे भाजपमध्ये भीती पसरली आहे. राहुलच्या नेतृत्वाला अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. राहुल यांच्यामागे अल्पसंख्याक वर्ग जाण्याची शक्यता आहे. काही अल्पसंख्याक गटाच्या पक्षांनी राहुल यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे भाजपला मतांच विभाजन होण्याची भीती आहे. याचा फटका पक्षाला बसण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळेच भाजपकडून वेगळा मुद्द्या चर्चीला आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जातंय. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागती; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

SCROLL FOR NEXT