Rahul Gandhi And Priyanka Gandhi At Wayanad Esakal
देश

Priyanka Gandhi Wayanad: आता वायनाडला प्रियंका गांधींचा 'हात'; पहिल्यांदाच उतरल्या निवडणुकीच्या मैदानात

Priyanka Gandhi: आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, "माझे वायनाड आणि रायबरेलीशी भावनिक नाते आहे."

आशुतोष मसगौंडे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता राहुल यांनी वायनाड मतदारसंघातून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रियंका गांधी आता वायनाडमधून लढणार आहेत.

आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, "माझे वायनाड आणि रायबरेलीशी भावनिक नाते आहे. मी गेली ५ वर्षे वायनाडचा खासदार होतो. प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी इथल्या लोकांचा आभारी आहे. आता प्रियंका गांधी वढेरा वायनाडमधून निवडणूक लढवतील, पण मी अधूनमधून वायनाडला भेट देत राहीन, माझे रायबरेलीशी जुने नाते आहे, मला आनंद आहे की मी त्यांचे प्रतिनिधित्व करू शकेन पण हा एक कठीण निर्णय होता."

यावेळी बोलताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या, "वायनाडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याने मला खूप आनंद होत आहे आणि मी त्यांना राहुल गांधींची अनुपस्थिती जाणवू देणार नाही. मी सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करत चांगली प्रतिनिधी होण्याचा माझा प्रयत्न असेल. रायबरेली आणि अमेठीशी माझे खूप जुने नाते आहे आणि त्यासाठी मी रायबरेलीत माझ्या भावाला मदत करेन त्याचबरोबर वाडनामधील लोकांचीही सेवा करेन.

प्रियांका गांधी दीर्घकाळापासून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, त्यांनी आजवर कधीही निवडणूक लढवली नाही. आता राहुल यांनी वायनाडमधून राजीनामा दिल्यानंतर प्रियंका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठीसह वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी राहुल यांना अमेठीतून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. तर वायनाडमध्ये ते विजयी झाले होती.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतून लढले होते. यावेळी त्यांनी दोन्ही ठिकाणांहून विजय मिळवला होता.

या निवडणुकीत गांधी कुटुंबाची पारंपारिक जागा असलेल्या अमेठीमध्ये गांधी परिवाराचे निकटवर्तीय किशोरी लाल शर्मा यांनी केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव केला होता. याचबरोबर त्यांच्यासह काँग्रेसने गेल्या निवडणुकीतील राहुल गांधी यांच्या पराभवाचा उट्टा काढला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT