देश

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत राहुल गांधी बनले आधुनिक श्रावणबाळ

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभर भ्रमण करत आहेत. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या भाषणाचे विविध पैलुंचे दर्शन घडवणारे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. आताही राहुल यांचा असाच एक फोटो काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. (Rahul Gandhi with Sonia Gandhi tying her shoe lace went viral on social media )

पोस्ट करण्यात आलेल्या फोटोत राहुल गांधी आपल्या मातोश्री आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या या फोटोला 1,564 पेक्षा अधिक लोकानी रिट्विट केले आहे तर 108 युजर्सनी प्रतिक्रियेसह हा फोटो रिट्विट केला आहे. अवघ्या काहीच वेळा या फोटोला 8,532 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज कर्नाटकातील मंड्या येथे पक्षाच्या भारत जोडो यात्रेला हजेरी लावली. राहुल यांनी आईच्या खांद्यावर हात ठेवून स्वागत केले. यानंतर यात्रेत उपस्थित महिला नेत्यांनी सोनिया गांधींचा हात हातात घेतला.

सुमारे 15 मिनिटे चालल्यानंतर राहुल यांनी सोनियांना परत कारकडे पाठवले. मात्र, काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सोनिया पुन्हा पदयात्रेत सहभागी झाल्या. सोनिया महिनाभरापूर्वीच कोरोनामधून बऱ्या झाल्या आहेत. सोनियांची प्रकृती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही.

सोनिया गांधींचे कर्नाटकशी नातं काय?

सोनिया गांधी यांचे कर्नाटकशी गहिरे नाते आहे. जेव्हा-जेव्हा गांधी कुटुंबावर राजकीय संकट आले आहे, तेव्हा दक्षिण भारताने त्यांना सावरले आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही दक्षिण भारतातील जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली होती. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचे सरकार सत्तेबाहेर गेले तेव्हा 1980 मध्ये त्यांना लोकसभेची सुरक्षित जागा हवी होती.

अशा परिस्थितीत त्यांनी कर्नाटकातील चिकमंगळूरमधून निवडणूक लढवली. इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील मेडक आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, नंतर त्यांनी रायबरेलीची जागा सोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT