Rahul Gandhi writes to lok sabha Speaker om birla after parts of his speech expunged marathi News  
देश

Rahul Gandhi Speech : लोकसभेतील भाषणाचे अंश वगळल्याने राहुल गांधी संतप्त! लोकसभाध्यक्षांना पत्र लिहीत व्यक्त केली नाराजी

Rahul Gandhi writes to Speaker : राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये काल (ता. १) सरकारला धारेवर धरताना घणाघाती आरोप केले होते.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. २ ः- लोकसभेमध्ये काल (ता. १) दिलेल्या भाषणातील काही अंश संसदीय नोंदींमधून वगळण्यात आल्याने विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल गांधींनी, ‘‘संसदीय नोंदींमध्ये माझे संपूर्ण भाषण पूर्ववत ठेवावे,’’ अशी मागणी केली आहे. तसेच सभागृहात आपण सत्य मांडल्याचाही दावा राहुल गांधींनी केला आहे.


राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये काल (ता. १) सरकारला धारेवर धरताना घणाघाती आरोप केले होते. त्यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आले होते. राहुल गांधींच्या या आक्रमकतेमुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. त्यांच्या भाषणातील बऱ्याच मुद्द्यांवर खुद्द पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी आक्षेप घेताना वादग्रस्त वक्तव्ये कामकाजातून वगळण्याची मागणी केली होती. त्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींच्या १०० मिनिटांच्या भाषणातील हिंदू धर्म आणि राज्यघटनेशी संबंधित मुद्दे संसदीय नोंदीतून काढून टाकले. काल रात्री उशिरापर्यंत लोकसभेचे कामकाज चालले होते. त्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास या नोंदी वगळल्याचा तपशील माध्यमांना कळविण्यात आला.

लोकशाही विरोधात कृत्य

या घटनाक्रमानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आक्षेप नोंदविला. ‘‘सभागृहात व्यक्त केलेले माझे मत सभागृहाच्या कामकाजातून हटविणे हे संसदीय लोकशाहीच्या आत्म्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे, हटविण्यात आलेल्या मुद्द्यांचा पुन्हा भाषणात समावेश केला जावा,’’ अशी मागणी राहुल गांधींनी केली. ‘‘माझ्या भाषणात काहीही आक्षेपार्ह नव्हते. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्याही भाषणात आरोपांचा भडिमार होता मात्र त्यांच्या भाषणातून एकच शब्द वगळण्यात आला. हा भेदभाव अनाकलनीय आहे. मी सभागृहात सत्य मांडले आहे. संसदेत जनतेशी संबंधित प्रश्न मांडण्याचा अधिकार प्रत्येक खासदाराला आहे. हेच लक्षात घेऊन मी भाषण दिले,’’ असा दावा राहुल गांधींनी या पत्रात केला.

‘वस्तुस्थिती वगळता येणार नाही’

आज संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी भाषणातील मुद्दे वगळल्यावरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. “मोदींच्या विश्वात सत्य वगळले जाऊ शकते. परंतु वस्तुस्थिती वगळली जाऊ शकत नाही. माझ्या भाषणातील हवे तेवढे मुद्दे हटवा परंतु मला जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे’’, असे राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT