Rahul Gandhi, Shashi Tharoor and Mallikarjun kharge 
देश

रिमोट कंट्रोलचा प्रश्नच नाही, दोन्ही उमेदवार दिग्गज; राहुल गांधी स्पष्टच बोलले

सकाळ डिजिटल टीम

तुरुवकेरे (कर्नाटक) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पक्षाच्या पुढील अध्यक्षांवर गांधी कुटुंब बाहेरून नियंत्रण ठेवणार या चर्चेचे खंडण केले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्या मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार शशी थरूर मैदानात आहेत. या दोघांपैकीच कोणी तर काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. ( Rahul Gandhi News in Marathi)

राहुल गांधी म्हणाले की, अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोन्ही उमेदवार दिग्गज नेते आहेत. 'भारत जोडो यात्रे' दरम्यान पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी राहुल यांनी मोदी सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, यात्रेत आपण एकटे नसून लाखो लोक सामील होत आहे. कारण ते देखील बेरोजगारी, महागाई आणि विषमतेला कंटाळले आहेत.

काहींना वाटतं, गांधी घराणे पुढच्या काँग्रेस अध्यक्षांना रिमोट कंट्रोलसारखे नियंत्रित करतील, यासंदर्भात गांधींना विचारले असता ते म्हणाले, अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दोन्ही उमेदवार उच्च दर्जाचे आहेत. त्यांच्याकडे दृष्टीकोन आहे. तसेच ते समजूतदार आणि दिग्गज आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही रिमोट कंट्रोल्ड (पक्षप्रमुख) आहे असे मला वाटत नाही. खरं सांगायचे तर अशा गोष्टी या नेत्यांना अपमानित करण्यासाठी बोलल्या जात असल्याचंही राहुल यांनी म्हटलं.

गांधींनी असंही सांगितले की 'भारत जोडो यात्रे'द्वारे लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या वेदना जाणून घ्यायच्या. 'भारत जोडो यात्रे'दरम्यान राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर असे ३,५०० किमी अंतर कापणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Rafael Nadal: 'राफा, तू टेनिसमधून ग्रॅज्युएट होतोय, मी अधिक इमोशनल होण्याआधी...', फेडररचं निवृत्त होणाऱ्या नदालला भावनिक पत्र

Latest Marathi News Updates : भाजपाला धडा शिकवणार- अनिल देशमुख

Health Tips For Men: पुरूषांनी स्वत:ला लावून घ्याव्यात या दहा सवयी, तरच रहाल फिट अन् फाईन

SCROLL FOR NEXT